एक्स्प्लोर
Advertisement
अभिनेता आफताब शिवदासानी पारंपरिक पद्धतीने विवाहबंधनात
नुकतेच आफताब-नीन श्रीलंकेला गेले होते, तेव्हा तिथल्या निसर्ग सौंदर्याने त्यांच्या मनात घर केलं. त्यामुळे दोघांनी पारंपरिक पद्धतीने पुन्हा विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.
कोलंबो : मस्ती, लव्ह के लिए कुछ भी करेगा, ग्रँड मस्ती यासारख्या चित्रपटांमध्ये झळकलेला बॉलिवूड अभिनेता
आफताब शिवदासानीने पारंपरिक पद्धतीने लग्न केलं आहे. कायदेशीर विवाहाच्या तब्बल तीन वर्षांनंतर त्याने नीन दुसांजशी पारंपरिक पद्धतीने लगीनगाठ बांधली.
5 जून 2014 रोजी आफताब आणि नीन यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं होतं. नुकतेच आफताब-नीन श्रीलंकेला गेले होते, तेव्हा तिथल्या निसर्ग सौंदर्याने त्यांच्या मनात घर केलं. त्यामुळे दोघांनी पारंपरिक पद्धतीने पुन्हा विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.
श्रीलंकेतल्या तंगल्लेमधील 'अनंतारा पीस हेवन'मध्ये हा विवाहसोहळा पार पडला. एका हत्तीवर बसून आफताबने विवाहस्थळी एन्ट्री घेतली, तर नीन डोलीमध्ये बसून आली.
लग्नसोहळ्याला दोघांचे जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. आफताबने लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
बॉलीवूड
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement