एक्स्प्लोर

Abdu Rozik Marriage : खरंच अब्दु रोजिक लग्न करतोय? शिव ठाकरेने सत्य सांगितले, मी त्याच्यासोबत 30 मिनिटे...

Abdu Rozik Marriage : वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहणारा अब्दु आत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काहींनी हा एखादा स्टंट असल्याची शंका व्यक्त केली. अब्दुचा खास मित्र असलेल्या शिव ठाकरेने अब्दुच्या लग्नाचे सत्य सांगितले आहे.

Abdu Rozik Marriage :  बिग बॉस 16 मध्ये झळकलेला  गायक अब्दु रोजिक (Abdu Rozik ) याची मोठी फॅन फॉलोईंग आहे. बिग बॉसमध्ये झळकल्यानंतर अब्दुवर भारतीय प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला. बिग बॉस शिवाय अब्दु रोजिक हा खतरो के खिलाडीमध्ये ही दिसला. वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहणारा अब्दु आत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अब्दुने आपल्या लग्नाची घोषणा केली आहे. त्याच्या या घोषणेने चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. पण, काहींनी हा एखादा स्टंट असल्याची शंका व्यक्त केली. अब्दुचा खास मित्र असलेल्या शिव ठाकरेने (Shiv Thakare) अब्दुच्या लग्नाचे सत्य सांगितले आहे. 

अब्दुने केली लग्नाची घोषणा 

अब्दु रोजिकच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार, अब्दु रोजिक 7 जुलैला लग्नबंधनात अडकणार आहे. वृत्तानुसार, 20 वर्षीय अब्दु हा  शारजाहमधील 19 वर्षीय अमिराती तरुणीसोबत लग्न करणार आहे. तसेच अब्दु रोजिकने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की मला एक मुलगी सापडली आहे जी माझा आदर करते, जी माझ्यावर खूप प्रेम करते. 

शिव ठाकरेने सांगितले सत्य... 

अब्दुच्या लग्नाबाबत 'NEWS 18'ने शिव ठाकरेशी संपर्क साधला. अब्दुच्या लग्नावर त्याचा खास मित्र शिव ठाकरेने त्याला सत्य सांगितले. शिव ठाकरेने सांगितले की, मी त्याच्याशी बोललो होतो. पण, त्याने लग्नाबाबत काहीच सांगितले नाही.त्यामुळे अब्दुच्या लग्नाची बातमी खोटी आहे का, असा प्रश्न शिवला पडला. शिवने पुढे सांगितले की, 'मला याबाबत काहीही माहिती नाही. मुलगी कोण आहे हे मला माहीत नाही. मलाही सोशल मीडियाच्या माध्यमातून या लग्नाची माहिती मिळाली. खरं तर, या बातम्या येण्यापूर्वी 30 मिनिटांआधीच अब्दुशी बोललो होतो आणि त्याने लग्नाबद्दल काहीही सांगितले नव्हते. या बातम्या खोट्या आहेत की नाही माहीत नसल्याचे शिव ठाकरेने सांगितले. 

अब्दुने शेअर केला व्हिडीओ

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Abduroziq Official (@abdu_rozik)

अब्दु याने गुरुवारी इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत आपल्या लग्नाची बातमी दिली. 'मी या प्रेमापेक्षा अधिक कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करणरा नाही.  मी माझ्या आयुष्यातील नवीन प्रवास सुरू करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही, असेही त्याने म्हटले होते. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Disha Vakani Father Death: 'TMKOC'च्या दयाबेनवर दु:खाचा डोंगर, वडिलांच्या निधनानंतर झाली 'अशी' अवस्था, भावंडं पूर्णपणे खचले
'TMKOC'च्या दयाबेनवर दु:खाचा डोंगर, वडिलांच्या निधनानंतर झाली 'अशी' अवस्था, भावंडं पूर्णपणे खचले
Girija Oak: 'प्लीज चोरा.. घेऊन जा' नॅशनल क्रश गिरीजा ओक असं का म्हणाली? नेमकं कुणाला काय चोरायला सांगतेय अभिनेत्री?
'प्लीज चोरा.. घेऊन जा' नॅशनल क्रश गिरीजा ओक असं का म्हणाली? नेमकं कुणाला काय चोरायला सांगतेय अभिनेत्री?
Ranveer - Shahrukh: एक पिक्चर काय चालला, रणवीर सिंह स्वत:ला बॉलीवूडचा धुरंधर समजायला लागला, पार्टीत शाहरुख खानला बघून दुर्लक्ष केलं?
एक पिक्चर काय चालला, रणवीर सिंह स्वत:ला बॉलीवूडचा धुरंधर समजायला लागला, पार्टीत शाहरुख खानला बघून दुर्लक्ष केलं?
Sara Arjun As Madhubala: कन्फर्म! भन्साळींच्या सिनेमाची 'मधुबाला' ठरली; काळजाचा ठाव घेणार 'ही' लोकप्रिय अभिनेत्री, चर्चांना पूर्णविराम
कन्फर्म! भन्साळींच्या सिनेमाची 'मधुबाला' ठरली; काळजाचा ठाव घेणार 'ही' लोकप्रिय अभिनेत्री, चर्चांना पूर्णविराम

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय; अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनी पदाच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी
Maharashtra Live blog updates: महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय; अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनी पदाच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी
Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Stock Market : शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
Donald Trump : चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
Embed widget