Abdu Rozik : 'छोटा भाईजान'च्या आयुष्यात मोठी उलथापालथ, सुरु होण्याआधीच संपलं नातं; अब्दू रोजिकने मोडला साखरपुडा
Abdu Rozik Wedding : अब्दू रोजिकने साखरपुडा मोडला आहे. अब्दूने यावर्षी 24 एप्रिल रोजी मजलिस शारजाह येथे कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत साखरपुडा केला होता.
![Abdu Rozik : 'छोटा भाईजान'च्या आयुष्यात मोठी उलथापालथ, सुरु होण्याआधीच संपलं नातं; अब्दू रोजिकने मोडला साखरपुडा abdu rozik calls off wedding with fiance amira know reason cultural differences bigg boss 16 contestant marathi news Abdu Rozik : 'छोटा भाईजान'च्या आयुष्यात मोठी उलथापालथ, सुरु होण्याआधीच संपलं नातं; अब्दू रोजिकने मोडला साखरपुडा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/19/7c78ea588974eb27eef040e22abcb31b1726711854655322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Abdu Rozik Calls Off Wedding : बिग बॉस 16 मध्ये झळकलेला ताजकिस्तानचा प्रसिद्ध गायक अब्दु रोझिकने (Abdu Rozik) साखरपुडा मोडल्याची मोठी बातमी समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी अब्दूने त्याच्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली होती. लवकरच लग्न करणार असल्याचं त्याने सांगितलं होतं. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याने लग्नाची तारीख पुढे ढकलल्याची माहिती दिली होती. आता अब्दूनं साखरपुडा मोडल्याचं समोर येत आहे. अब्दूने यावर्षी 24 एप्रिल रोजी मजलिस शारजाह येथे कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत साखरपुडा केला होता. त्यानंतर लवकर लग्न करणार असल्याची घोषणाही केली होती. मात्र, आता हे लग्न मोडलं आहे.
अब्दू रोजिकने मोडला साखरपुडा
बिग बॉस 16 फेम अब्दु रोझिकचा (Abdu Rozik) साखरपुडा होऊन सहा महिने झाले होते आणि लवकरच दोघांचं लग्न होणार होतं, पण आता त्यांचं नातं संपलं आहे. ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अब्दूने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अब्दूने लग्न मोडण्यामागचं कारण देताना सांगितलं की, माझ्या आणि अमिराच्या संस्कृतीमध्ये खूप फरक होता, त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला.
अब्दु रोजिकला कसा जोडीदार हवाय?
अब्दूने सांगितलं की, लग्न तोडण्याचं कारण म्हणजे त्याच्या आणि अमिरामधील सांस्कृतिक फरक. तो पुढे म्हणाला की, 'जसं आमचं नातं विकसित होत गेलं, तसं आम्हाला काही सांस्कृतिक फरकांना सामोरं जावं लागलं, ज्यामुळे आम्हाला हा निर्णय घेणं भाग पडलं.'
भावी जोडीदाराबद्दल बोलताना अब्दू म्हणाला की "तुम्हा सर्वांना माहीत आहे की, मी एक मजबूत मनाचा माणूस आहे, जो दैनंदिन जीवनात अनेक आव्हानांना सामोरं जातो. यासाठी मानसिकदृष्ट्या मजबूत आणि लवचिक असा जोडीदार हवा."
View this post on Instagram
'मला पुन्हा प्रेम मिळेल...'
अब्दू रोजिकने पुढे सांगितलं की, 'मी माझं आरोग्य आणि तब्येतीचा खूप आभारी आहे. मी जसा आहे, त्यासाठी तुम्ही सर्व मला ओळखता आणि तुम्ही दाखवलेला विश्वास आणि पाठिंबा, ज्यामुळे मला प्रसिद्ध होण्यास मदत झाली आहे. मला खात्री आहे की, जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा प्रेम मला पुन्हा मिळेल. या काळात तुम्ही दिलेल्या अतूट पाठिंब्याबद्दल आणि अभिनंदनाबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Bigg Boss Marathi : बिग बॉस आणि रितेश निक्कीचे पाठीराखे, महेश मांजरेकरांना परत आणा; बिग बॉस प्रेमींची मागणी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)