VIDEO : 1800 कोटींची संपत्ती असलेला सुपरस्टार बनला 'भिकारी', आदिमानवाप्रमाणे रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल
Aamir Khan Caveman Look Viral : सध्या सोशल मीडियावर एका आदिमानवाचा व्हिडीओ व्हायरल होत असून हा व्यक्ती सुपरस्टार असल्याचं समोर आलं आहे.

Superstar Transformation Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आदिमानव रस्त्यावर फिरताना दिसत आहे. मुंबईमध्ये अचानक हा आदिमानव दिसल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आणि हा व्यक्ती नक्की कोण आहे, असा प्रश्न निर्माण झाला. आता या व्यक्तीची ओळख पटली आहे. हा व्यक्ती सुपरस्टार असल्याचं समोर आलं आहे. मात्र, 1800 कोटींच्या मालकावर अशी आदिमानवाप्रमाणे फिरण्याची वेळ का आली आणि हा व्यक्ती नेमका कोण आहे, याचं उत्तर जाणून घ्या.
1800 कोटींची संपत्ती असलेला सुपरस्टार बनला आदिमानव
व्हायरल व्हिडिओमध्ये, एक माणूस आदिम माणसासारखा पोशाख घातलेला, लांब केस आणि लांब दाढी असलेला, मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्याच्याकडे पाहून तो कोण आहे, हे ओळखणंही कठीण झालं आहे. हा माणूस बग्गी ओढतानाही दिसतो आणि लोक त्याला एक सामान्य माणूस समजून दुर्लक्ष करताना दिसतात.
व्हायरल व्हिडीओमध्ये फिरणारी व्यक्ती आहे सुपरस्टार
आदिमानवाच्या माणसाच्या वेषात रस्त्यावर फिरणारा हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून आमिर खान आहे. आमिर खान या लूकसाठी तयार होताना व्हिडिओ आणि फोटो समोर आल्यानंतर हे उघड झाले. या छायाचित्रांमध्ये आमिर खान केसांचा विग आणि दाढी घातलेला दिसत होता. आमिरच्या व्हायरल व्हिडिओवर चाहतेही प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, सुपरस्टार 'भिकारी' बनण्यामागचं कारण काय, हे अद्याप समोर आलेलं नाही.
View this post on Instagram
1800 कोटींपेक्षा जास्त संपत्ती
अभिनेता आमिर खान बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण, त्यांच्या संपत्तीत याचा परिणाम झालेली नाही. कारण, त्याच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये चित्रपटांची निर्मिती होत असून ते बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवण्यात यशस्वी ठरत आहेत. फर्स्ट पोस्टनुसार, आमिर खानकडे 1862 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
आमिरचा मुलगा जुनैदचं मोठ्या पडद्यावर पदार्पण
आमिर खानचा मुलगा जुनैद खान मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. जुनैदचा 'लवयापा' हा चित्रपट 7 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात जुनैद खानसोबत दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी खुशी कपूरही बॉलिवूड डेब्यू करणार आहे.
Aamir Khan’s Caveman Transformation Video Takes the Internet by Storm .#AamirKhan #Caveman #Mumbai #bollywood #ViralVideo pic.twitter.com/NBZsxsBHWA
— Circle Of Bollywood (@CircleBollywood) January 30, 2025
महत्त्वाच्या इतर बातम्या
Priyanka Chopra : प्रियंका चोप्रा सर्वात महागडी भारतीय अभिनेत्री, महेश बाबूसोबतच्या आगामी चित्रपटासाठीची फी ऐकून बसेल धक्का
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
