एक्स्प्लोर

Priyanka Chopra : प्रियंका चोप्रा सर्वात महागडी भारतीय अभिनेत्री, महेश बाबूसोबतच्या आगामी चित्रपटासाठीची फी ऐकून बसेल धक्का

Priyanka Chopra Fees For SSMB29 : अभिनेत्री प्रियंका चोप्रा एस एस राजामौली यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये ती महेश बाबूसोबत दिसणार आहे.

Priyanka Chopra & Mahesh Babu Upcoming Movie : बॉलिवूडची 'देसी गर्ल' अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या हॉलिवूड गाजवताना दिसत आहे. अभिनेत्री प्रियंका चोप्रा गेल्या काही वर्षांपासून हिंदी चित्रपटांपासून दूर आहे. ती शेवटची 2019 मध्ये स्काय इज पिंक चित्रपटात दिसली होती. त्यानंतर तिने कोणताही बॉलिवूड चित्रपट केलेला नाही. यामुळेच तिचे चाहते तिला हिंदी चित्रपटामध्ये पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रियंका चोप्राच्या चाहत्यांसाठी आता एक चांगली बातमी समोर आली आहे. प्रियंका चोप्रा लवकरच एसएस राजामौली यांच्या पॅन इंडिया चित्रपटात दिसणार आहे.

प्रियंका चोप्रा सर्वात महागडी भारतीय अभिनेत्री

अभिनेत्री प्रियंका चोप्राने दिग्दर्शक 'आरआरआर' फेम एसएस राजामौली यांच्यासोबत चित्रपट साईन केल्याची माहिती आहे. एसएस राजामौली यांच्या आगामी चित्रपटात प्रियंका चोप्रा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटात साऊथ सुपरस्टार महेश बाबू आणि प्रियंका चोप्रा यांची जोडी पाहायला मिळणार आहे. ही बातमी समोर येताच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रियंका चोप्रा इतक्या वर्षांनंतर हिंदी फिल्म इंडस्ट्रीत कमबॅक करणार आहे. याशिवाय महेश बाबू आणि प्रियंकाची केमिस्ट्री पाहण्यासाठीही सर्वजण आतूर झाले आहेत.

महेश बाबूसोबतच्या आगामी चित्रपटासाठीची फी किती?

आता प्रियंका चोप्रा 6 वर्षांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज आहे. प्रियांकाने एसएस राजामौली यांच्या चित्रपटाची ऑफर स्वीकारली आहे. यासाठी तिने मोठी फी आकारली आहे, ज्यामुळे ती भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे. प्रियांका चोप्राने एसएस राजामौली यांचा 'एसएसएमबी29' हा चित्रपट साइन केला आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, 'एसएसएमबी29' या चित्रपटासाठी प्रियंकाने 30 कोटी रुपये इतकी मोठी फी आकारली आहे. यासह, प्रियांका भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.

SSMB29 मधील स्टार कास्ट

एसएस राजामौली यांचा 'एसएसएमबी29' या अ‍ॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर चित्रपटात प्रियंका चोप्रासोबत साऊथ सुपरस्टार महेश बाबू आणि जॉन अब्राहम देखील दिसणार असल्याची बातमी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, राजामौलीच्या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारनची जागा जॉन अब्राहमने घेतली आहे. या चित्रपटाद्वारे जॉन आणि प्रियांका 17 वर्षांनी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. याआधी दोघेही 2008 मध्ये आलेल्या 'दोस्ताना' चित्रपटात एकत्र दिसले होते.

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टॉप 5 भारतीय अभिनेत्री

प्रियांका चोप्रा नंतर, दीपिका पदुकोण सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. दीपिका तिच्या चित्रपटांसाठी 15-30 कोटी रुपये घेते. तिसऱ्या क्रमांकावर कंगना रणौत आहे ज्याचे मानधन 15 ते 27 कोटी रुपये आहे. या यादीत कतरिना कैफ 15 ते 25 कोटींच्या मानधनासह चौथ्या क्रमांकावर आहे आणि तर आलिया भट्ट पाचव्या क्रमांकावर असून ती 10 ते 20 कोटी मानधन घेते.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Malavika Mohanan : प्रभासच्या 'डार्लिंग'चा ग्लॅमरस अंदाज, कर्व्ही फिगर अन् कातील अंदाज पाहून थक्क व्हाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनंतरही  भारतीय शेअर बाजारात तेजी, चार कारणांमुळं सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बच्या घोषणेनंतरही शेअर बाजाराची दमदार वाटचाल, सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारी कार्यालयात पैशांची उधळण; 500 च्या नव्याकोऱ्या खोट्या नोटांचे बंडल
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारी कार्यालयात पैशांची उधळण; 500 च्या नव्याकोऱ्या खोट्या नोटांचे बंडल
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case | काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओत आढळले १९ पुरावे, बोटांचे ठसे आरोपींना नेणार शिक्षेपर्यंतABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 27 March 2025  दुपारी ३ च्या हेडलाईन्सUddhav Thackeray : हिंदू - मुस्लिमांमध्ये भांडणं लावणाऱ्या भाजपने सांगावं की हिंदूत्ववाद सोडला...Uddhav Thackeray on Saugat-e-Modi : बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगाते मोदी देणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनंतरही  भारतीय शेअर बाजारात तेजी, चार कारणांमुळं सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बच्या घोषणेनंतरही शेअर बाजाराची दमदार वाटचाल, सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारी कार्यालयात पैशांची उधळण; 500 च्या नव्याकोऱ्या खोट्या नोटांचे बंडल
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारी कार्यालयात पैशांची उधळण; 500 च्या नव्याकोऱ्या खोट्या नोटांचे बंडल
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांनाच एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांनाच एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
Santosh Deshmukh Case: काळ्या रंगाची स्कॉर्पिओ अन् तो साक्षीदार ठरणार गेमचेंजर, संतोष देशमुख प्रकरणात महत्त्वाची अपडेट
काळ्या रंगाची स्कॉर्पिओ अन् 'तो' साक्षीदार ठरणार गेमचेंजर, संतोष देशमुख प्रकरणात महत्त्वाची अपडेट
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
Embed widget