Aaliyah Kashyap’s engagement party: थाटात पार पडली अनुराग कश्यपच्या लेकीची एंगेजमेंट पार्टी; 'या' कलाकारांनी लावली हजेरी
आलिया कश्यपची (Aaliyah Kashyap) एंगेजमेंट पार्टी गुरुवारी मुंबईत पार पडली. या एंगेजमेंट पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
Aaliyah Kashyap’s engagement party: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपची (Anurag Kashyap) मुलगी आलिया कश्यपने (Aaliyah Kashyap) तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरसोबत (Shane Gregoire) एंगेजमेंट केली आहे. दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. आलियाची एंगेजमेंट पार्टी गुरुवारी मुंबईत पार पडली. या एंगेजमेंट पार्टीला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
शेन आणि आलियानं एंगेजमेंट पार्टीसाठी केला होता खास लूक
एंगेजमेंट पार्टीसाठी आलिया कश्यपने पेस्टल रंगाचा लेहेंगा आणि मॅचिंग ज्वेलरी असा लूक केला होता. तर शेनने शेरवानी आणि मिंट ग्रीन कलरचे जॅकेल असा लूक केला होता. दोघांच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. अनुराग कश्यपने आलियाच्या एंगेजमेंट पार्टीसाठी ऑल ब्लॅक लूक केला होता.
View this post on Instagram
या कलकारांनी लावली हजेरी
सुहाना खान, खुशी कपूर, पलक तिवारी, इब्राहिम अली खान या कलाकारांनी आलिया कश्यपच्या एंगेजमेंट पार्टीला हजेरी लावली. आलिया कश्यपच्या एंगेजमेंट पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनुराग कश्यपची एक्स वाईफ अभिनेत्री कल्की ही तिची मुलगी सप्पोसोबत आलियाच्या एंगेजमेंट पार्टीला आली होती. फिल्ममेकर इम्तियाज अलीनं देखील आलियाच्या एंगेजमेंट पार्टीला हजेरी लावली.
View this post on Instagram
आलिया 22 वर्षांची आहे तर शेन 23 वर्षांचा आहे, दोघे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. आता लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वी आलियानं खास फोटो शेअर करुन तिच्या साखरपुड्याची माहिती नेटकऱ्यांना दिली होती. या फोटोमध्ये आलिया कश्यप ही तिची अंगठी फ्लॉन्ट करताना दिसली. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, "माझा जिवलग मित्र, माझा जोडीदार, माझा साथीदार आणि आता माझा होणारा पती. तू माझ्या आयुष्यातील प्रेम आहेस. खरं प्रेम कसं असतं हे मला दाखवल्याबद्दल खूप धन्यवाद. तुला हो म्हणणं ही आतापर्यंत मी केलेली एक चांगली गोष्ट आहे. तुझ्यासोबत आता उर्वरित आयुष्य घालवण्याची मी प्रतीक्षा करू शकत नाही. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे"
संबंधित बातम्या
Aaliya Kashyap : अनुराग कश्यपच्या लेकीने गुपचूप उरकला साखरपुडा; रोमॅंटिक फोटो शेअर करत म्हणाली...