Aaliya Kashyap : अनुराग कश्यपच्या लेकीने गुपचूप उरकला साखरपुडा; रोमॅंटिक फोटो शेअर करत म्हणाली...
Aaliyah Kashyap Gets Engaged : दिग्दर्शक अनुराग कश्यपची लेक आलियाने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. बॉयफ्रेंडसोबतचा रोमॅंटिक फोटो शेअर करत तिने यासंदर्भात चाहत्यांना माहिती दिली आहे.
![Aaliya Kashyap : अनुराग कश्यपच्या लेकीने गुपचूप उरकला साखरपुडा; रोमॅंटिक फोटो शेअर करत म्हणाली... anurag Kashyap daughter Aaliyah Kashyap Gets Engaged To Shane Gregoire photo shared social media Aaliya Kashyap : अनुराग कश्यपच्या लेकीने गुपचूप उरकला साखरपुडा; रोमॅंटिक फोटो शेअर करत म्हणाली...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/21/6a997d0f9b0ca0b066d5591a954a60761684655599519254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aaliyah Kashyap Gets Engaged To Shane Gregoire : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक अनुराग कश्यपची लेक (Anurag Kashyap) आलिया कश्यप (Aaliyah Kashyap) सध्या चर्चेत आहे. आलियाने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. बॉयफ्रेंडसोबतचा रोमॅंटिक फोटो शेअर करत तिने यासंदर्भात चाहत्यांना माहिती दिली आहे.
आलिया कश्यप (Aaliyah Kashyap) सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच अॅक्टिव्ह आहे. आता आलियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आलियाने तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोइरेसोबत (Shane Gregoire) गुपचूप साखरपुडा उरकला आहे. आलिया गेल्या काही दिवसांपासून शेन ग्रेगोइरेसोबतचे फोटो शेअर करत होती.
View this post on Instagram
आलिया कश्यपने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत आलिया कश्यप तिची अंगठी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत आलिया तिच्या बॉयफ्रेंडसोबत म्हणजेच शेन ग्रेगोइरेसोबत रोमॅंटिक अंदाजात दिसत आहे.
आलिया कश्यपची खास पोस्ट (Aaliyah Kashyap Post)
आलिया कश्यपने शेनसोबतचा फोटो शेअर करत लिहिलं आहे,"माझा जिवलग मित्र, माझा जोडीदार, माझा साथीदार आणि आता माझा होणारा पती... तू माझ्या आयुष्यातील प्रेम आहेस. खरं प्रेम कसं असतं हे मला दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद... तुला हो म्हणणं ही आतापर्यंत मी केलेली एक चांगली गोष्ट आहे. तुझ्यासोबत आता उर्वरित आयुष्य घालवण्याची मी प्रतीक्षा करू शकत नाही. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे".
आलिया कश्यपवर कौतुकाचा वर्षाव
आलिया कश्यपने सोशल मीडियावर शेनसोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आलियाच्या फोटोवर अनुराग कश्यपसह सैयामी खेर, सनी लिओनी, जान्हवी कपूर, कुब्रा सैत, शोभिता धूलिपाला, अलाया एफ आणि शनाया कपूरसह अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. आलिया कश्यप आणि सेनचा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
आलिया कश्यपचं स्वत:चं युट्यूब चॅनल असून ती फॅशन आणि मेकअप संदर्भातील टिप्स सोशल मीडियावर शेअर करत असते. पण मनोरंजनसृष्टीपासून मात्र ती दूर आहे. आता आलिया आणि सेनच्या लग्नसोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
संबंधित बातम्या
Anurag Kashyap : अनुराग कश्यपचा अँजियोप्लास्टीनंतरचा लूक व्हायरल; मुलगी आलियानं शेअर केला Video
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)