(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Milind Gawali : "केस कापणे हा सुद्धा एक टास्क"; 'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत
Milind Gawali : मिलिंग गवळी यांनी खासगी आयुष्यासंबंधित एक पोस्ट शेअर केली आहे.
Milind Gawali : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही लोकप्रिय मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आजही या मालिकेची क्रेझ कायम आहे. या मालिकेत अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) अनिरुद्धची भूमिका साकारत आहेत. आता 'केस कापणे हा सुद्धा एक टास्क आहे', असं म्हणत मिलिंग गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
मिलिंग गवळी सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह आहेत. सोशल मीडियावर ते व्यावसायिक कामासह वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक पोस्ट शेअर करत असतात. अशातच आता त्यांनी खासगी आयुष्यासंबंधित केलेली पोस्ट चर्चेत आहे. मिलिंद गवळी यांनी लिहिलं आहे,"केस कापणे हा सुद्धा एक टास्क आहे. कन्ट्युनिटी मेंटेन करणं सुद्धा कठीण काम असतं. मालिका सुरू असताना केस कधी कापायचे हा खूप मोठा प्रश्न असतो. सारखे सीन चालू असतात त्याच्यामध्येच जर तुम्ही केस कापले तर तो एक मोठा जर्क दिसतो".
कोरोनामध्ये केस कापायचा माझा छान सराव झाला : मिलिंद गवळी
मिलिंद गवळी यांनी लिहिलं आहे,"मी ज्यावेळेला सिनेमे करायचो त्यावेळेला तर एक हेअर स्टाईल ही मला जवळजवळ वर्षभर तरी ठेवावी लागायची. कारण सिनेमाचं शूटिंग पूर्ण होईपर्यंत ती केसांची स्टाईल बदलता यायची नाही, त्यामुळे फक्त केस ट्रिम करत राहणे एवढेच करता यायचं आणि मग खूप मोठा प्रश्न पडायचा की केस कापणाऱ्याला आपण काय सांगायचं , की आपल्याला कसे केस कापून हवे आहेत . त्यामुळे बरीच वर्ष मी माझे माझे केस ट्रिम करायचो, आता स्वतःचे केस कापण्याचा इतका सराव झाला आहे की कोरोनामध्ये दर पंधरा-वीस दिवसांनी मी माझेच केस ट्रिम करत बसायचो, काही चुकलं तर भीतीच नसायची, तेव्हा केस कापायचा माझा छान सराव झाला".
View this post on Instagram
पूर्वी केस कापायला हजारो रुपये द्यायचे मिलिंग गवळी...
मिलिंग गवळी यांनी पुढे लिहिलं आहे,"पण गेल्या तीन वर्षापासून मी ठाण्यात एका व्यक्तीकडे केस कापतो आहे. पण गेल्या तीन वर्षात मी त्याच्याकडे फक्त सहा वेळा गेलो आहे. मधल्या वेळेला मी माझे माझे केस स्वतः ट्रिम करतो. पूर्वी केस कापायला अगदी दोन हजार अडीच हजार रुपये पण द्यायचो . घरी आपले केस कापायला बोलवण्याच्या ऐवजी मला स्वतः सलोन मध्ये जाऊन केस कापायला आजही छान वाटतं. माझे केस कापणाऱ्या व्यक्तीला आता अनिरुद्ध पात्राच्या केसांची स्टाईल इतकी चांगली पाठ झाली आहे की मला त्याला काहीच सांगावं लागत नाही, जाऊन फक्त खुर्चीत बसायचं आणि छानशी कॉफी पीत आपले केस कापून घ्यायचे. दोन-तीन महिन्यात ना हा एक छान अनुभव असतो".
संबंधित बातम्या