A. R. Ameen: थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन; शूटिंगदरम्यान क्रेन अपघात, म्हणाला...
ए. आर. अमीननं (A. R. Ameen) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून त्यानं शूटिंगदरम्यान घडलेल्या घटनेबाबत सांगितलं.

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. ए. आर. रहमान यांचा मुलगा ए. आर. अमीन (A. R. Ameen) हा देखील संगीत क्षेत्रात काम करतो. नुकतीच ए. आर. अमीनसोबत एक घटना घडली. ए. आर. अमीन हा एका शूटिंग सेटवर गाण्याचे शूटिंग करत होता. त्या शूटिंग सेटमध्ये क्रेनवर एक झुंबर लावले होते. ते झुंबर अचानक कोसळले. अमीननं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन या संपूर्ण घटनेबद्दल चाहत्यांना माहिती दिली.
ए. आर. अमीनची पोस्ट
ए. आर. अमीननं शूटिंग सेटचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये क्रेनला लावलेलं झुंबर दिसत आहे. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "मी माझे आई-वडील, कुटुंब, हितचिंतक आणि माझे गुरू यांचा आभारी आहे की, मी आज सुरक्षित आणि जिवंत आहे. तीन दिवसांपूर्वी, मी एका गाण्याचे शूटिंग करत होतो आणि मी कॅमेर्यासमोर परफॉर्म करण्यावर लक्ष केंद्रित करत होतो. तेथील टीम सुरक्षेकडे लक्ष देईल, असा माझा विश्वास होता. मी स्टेजच्या अगदी मध्यभागी असताना क्रेनला लटकलेले झुंबर खाली कोसळले. मी जिथे थांबलो होतो आणि झुंबर जिथे पडले त्यामध्ये केवळ काही इंचाचा फरक होता. माझी टीम आणि मी शॉक झालो आहोत. त्या आघातातून सावरण्याचा प्रयत्न करत आहोत." ए. आर. अमीननं शेअर केलेल्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स
अमीननं शेअर केलेल्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या. बोनी कपूर यांनी अमीनच्या पोस्टला कमेंट केली, 'तू खूप चांगला व्यक्ती आहेस, देव तुझे नेहमी रक्षण करेल.' तसेच अमीनची बहीण खतीजा रहमाननं कमेंट केली, 'आम्ही नेहमी तुझ्यासाठी प्रार्थना करतो. काळजी घे.' ए.आर. रहमान यांनी देखील अमीनच्या पोस्टला कमेंट केली. त्यानं कमेंट करत लिहिलं, 'चमत्कार, देवाची कृपा!'
ए. आर. रहमान हा सोशल मीडियावर त्याच्या गाण्याबद्दल चाहत्यांना माहिती देत असतो. अनेकवेळा तो ए.आर. रहमान यांच्यासोबतचे कॉन्सर्टमधील फोटो शेअर करतो.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
A. R. Rahman: संगीताचा बादशाह असणाऱ्या 'ए.आर.रहमान' यांचं खरं नाव माहितीये? हिट गाण्यांना दिलं संगीत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
