एक्स्प्लोर
लग्नासाठी योग्य वय कोणतं?, सलमान खान म्हणतो....
बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर अशी ख्याती असलेला अभिनेता सलमान खान आता 53 वर्षांचा आहे.
मुंबई : 'कटप्पाने बाहुबलीला का मारलं' याचं उत्तर मिळालं पण बॉलिवूडचा दबंग सलमान खान लग्न कधी करणार, हा प्रश्न अनुत्तरीतच होता. मात्र आता सलमानने या प्रश्नाचंही उत्तर दिलं आहे. 72 वर्ष हे लग्नासाठी योग्य वय असल्याचं सलमान खानने म्हटलं. 'भारत' सिनेमाच्या निमित्ताने एबीपीला दिलेल्या मुलाखतीत सलमान लग्नाच्या विषयावर भाष्य केलं.
बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर अशी ख्याती असलेला अभिनेता सलमान खान आता 53 वर्षांचा आहे. सिनेसृष्टीत त्याला 30 वर्ष पूर्ण झाली आहेत. या काळात त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं. त्यामुळेच तो लग्न कधी करणार हा प्रश्न अनेकांना कायम पडतो. 'भारत' चित्रपटात सलमान खानने 70 वर्षांच्या वृद्धाची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याच आधारावर लग्नाचं योग्य वय 72 वर्ष असल्याचं सलमानने सांगितलं.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच आपला लग्नसंस्थेवर अजिबात विश्वास नसल्याचं म्हटलं होतं. "लग्नसंस्था हळूहळू लुप्त होत जाणार आहे. पण सहचर्यावर माझा पूर्ण विश्वास आहे," असं तो म्हणाला होता.
सरोगसीद्वारे बाबा होणार?
सलमान बाबा होण्याची तयारी करत असल्याची चर्चा काही महिन्यांपूर्वी रंगली होती. सलमान सरोगसीच्या माध्यमातून पितृत्व अनुभवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. वडील सलीम आणि आई सलमा खान यांना नातवंडांचं तोंड पाहायचं असल्याचं सलमान खानने सांगितलं होतं. त्यामुळे येत्या काही महिन्यात सरोगेट पद्धतीने वडील होण्याचा सलमानचा मानस आहे.
'नच बलिए'ची निर्मिती
दरम्यान सलमान खान टीव्हीवरील डान्स रिअॅलिटी शो नच बलिएची निर्मिती करणार आहे. सध्याचं कपल आणि एक्स कपल अशी नच बलिएच्या नव्या मोसमाची कन्सेप्ट असेल, खुद्द सलमाननेच याबाबत माहिती दिली. "मला टीव्हीमुळे लोक ओळखू लागले," असा दावा सलमानने केला. "लोकांना सिनेमातील व्यक्तिरेखा आवडतात, लक्षात राहतात. परंतु 'दस का दम', 'बिग बॉस'सारख्या शोमधून मी जसा प्रत्यक्षात आहे तसा दिसतो," असंही सलमान म्हणाला.
VIDEO | 'भारत'च्या निमित्ताने सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्याशी गप्पा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement