(Source: ECI/ABP News/ABP Majha)
20 Years Of Kal Ho Naa Ho: 'कल हो ना हो'ची 20 वर्षे; करण जोहरनं शेअर केली भावूक पोस्ट, म्हणाला, "मी हा चित्रपट पाहतो तेव्हा प्रत्येक फ्रेममध्ये..."
'कल हो ना हो' (Kal Ho Naa Ho) या चित्रपटाला रिलीज होऊन 20 वर्षी झाल्यानं करण जोहरनं नुकतीच एक भावून पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं त्याच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
20 Years Of Kal Ho Naa Ho: 'कल हो ना हो' (Kal Ho Naa Ho) हा चित्रपट रिलीज होऊन 20 वर्षे झाली आहेत. निखिल अडवाणी दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खान (Shah Rukh Khan), प्रीती झिंटा (Preity Zinta) , सैफ अली खान (Saif Ali Khan) या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. आजही अनेकजण हा चित्रपट आवडीनं बघतात. आज या चित्रपटाला रिलीज होऊन 20 वर्षी झाल्यानं करण जोहरनं (Karan Johar) नुकतीच एक भावून पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं त्याच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
करण जोहरची पोस्ट (Karan Johar Post)
करण जोहरनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, "हा चित्रपट माझ्यासाठी आणि कदाचित आपल्या सर्वांसाठी एक भावनिक प्रवास आहे. अशा अप्रतिम स्टारकास्टला आम्ही एकत्र आणले जी हृदयाला भिडते. संपूर्ण टीम आणि कॅमेऱ्याच्या मागील कलाकारांचे खूप खूप अभिनंदन ज्यांनी 'कल हो ना हो' हा चित्रपट बनवला."
पुढे करणनं पोस्टमध्ये लिहिलं, "माझ्यासाठी हा शेवटचा चित्रपट आहे ज्यात माझ्या वडिलांनी धर्मा परिवारातील सदस्य म्हणून काम केलं. आजही जेव्हा मी पुन्हा हा चित्रपट पाहतो तेव्हा प्रत्येक फ्रेममध्ये मला त्यांची उपस्थिती जाणवते. धन्यवाद, बाबा, आम्हाला प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन केल्याबद्दल आणि महत्त्वाच्या कथा तयार केल्याबद्दल…आणि जे योग्य आहे त्यासाठी नेहमी पाठिशी उभे राहिल्याबद्दल. मला नेहमी तुमची आठवण येते."
"आणि दिग्दर्शनात पदार्पण केल्याबद्दल निखिलचे आभार!", असंही करणनं पोस्टमध्ये लिहिलं.
View this post on Instagram
'कल हो ना हो' नं बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ (Kal Ho Naa Ho Box Office Collection)
रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाची निर्मिती जवळपास 28 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली होती. या चित्रपटाने भारतातील बॉक्स ऑफिसवर 38.85 कोटींचा व्यवसाय केला. तसेच या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 82.05 कोटी रुपयांचे कलेक्शन केलं. या चित्रपटात जया बच्चन, दारा सिंह, झनक शुक्ला आणि सोनाली ब्रेंद्रे यांसारखे स्टार्सही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: