(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona | Aditya Narayan आणि त्याची पत्नी Shweta Agarwal कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियातून दिली माहिती
गायक आदित्य नारायण (Aditya Narayan) आणि त्याची पत्नी श्वेता अगरवाल (Shweta Agarwal) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली असून ते आता क्वॉरन्टाईन आहेत.
मुंबई : बॉलिवूडकरांना कोरोनाची लागण होण्याची संख्या वाढतच असून आता गायक आदित्य नारायण आणि त्याची पत्नी श्वेता अगरवाल यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आदित्य नारायणने ही बातमी त्याच्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दिली आहे. आदित्य आणि श्वेता यांचे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न झालं होतं.
सध्या ही जोडी क्वॉरंटाईन असल्याची माहिती आदित्य नारायण यांनी दिली आहे. त्याने त्याच्या चाहत्यांना कोरोना बाबत खबरदारी घेण्याचं आणि कोरोनाच्या नियमावलीचे पालन करण्याचं आवाहन केलं आहे. आदित्य नारायण हा प्रसिध्द गायक उदित नारायण यांचा मुलगा आहे.
आदित्य नारायणने आपल्या इन्स्टाग्रामवर लिहलं आहे की, "दुर्भाग्याने माझा आणि माझी पत्नी श्वेता अगरवाल हिचा कोविड 19 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे आणि सध्या आम्ही क्वॉरन्टाईन आहोत. त्यामुळे कृपया सुरक्षित रहा, नियमावलीचे पालन करा आणि आमच्यासाठी प्रार्थना करा."
View this post on Instagram
आदित्य नारायणचे चाहते त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या चांगल्या आरोग्याची प्रार्थना करत आहेत.
कोरोनाच्या विळख्यात आता हळूहळू बॉलिवूड सेलिब्रिटी येताना दिसत आहेत. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. अक्षय कुमारने ट्वीट करत सांगितलं की, आज सकाळी माझी कोविड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी सर्व प्रोटोकॉल पाळत स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मी घरी क्वॉरंटाईन झालो आहे आणि सर्व आवश्यक वैद्यकीय उपचार घेत आहे. विनंती करतो की माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी त्यांची कोरोना टेस्ट करुन घ्यावी आणि स्वत: ची काळजी घ्यावी.
त्या आधी आलिया भट्ट, रणबीर कपूर (Ranbir Kapoor), संजय लीला भंसाळी (Sanjay Leela Bhansali), मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee), क्रिती सेनन यांच्या काही बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Akshay Kumar Corona Positve | बॉलिवूडमधील 'खिलाडी' अक्षय कुमारला कोरोनाची लागण
- Coronavirus | लस घेऊनही संगितकार बप्पी लहिरी यांना कोरोनाची लागण, ब्रीच कॅन्डीमध्ये दाखल
- Lockdown | पुन्हा लॉकडाऊन नको, बॉलिवूडची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी