पडद्यावर 'या' अभिनेत्रीनं सख्ख्या भावासोबत रोमान्स केला अन् होत्याचं नव्हतं झालं; चित्रपटावर बंदी घालण्याची झालेली मागणी
Bollywood Actress Life Story: 40 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्गज अभिनेता मेहमूद यांची बहीण, मीनू मुमताज यांनी अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले.

Bollywood Actress Life Story: हिंदी चित्रपटसृष्टीत (Bollywood News) अभिनेत्यांपेक्षा अभिनेत्रींचा जास्त प्रभाव राहिला आहे. त्या काळातील सुंदर, देखण्या अभिनेत्री पडद्यावरच प्रेक्षकांचं मनोरंजन करायच्या नाहीत, तर त्या प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या... बॉलिवूडमधलं त्या काळातलं असंच एक नाव म्हणजे, अभिनेत्री मीनू मुमताज (Minoo Mumtaz). हा पण ही अभिनेत्री म्हणजे, दिग्गद मुमताज नाही बरं का... ही मुमताज वेगळी, जिला तिच्या नावामुळे सिनेसृष्टीत वेगळाच फायदा झाला. कारण, बरेचजण हिला दिग्गज अभिनेत्री मुमताज समजत असतं.
40 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्गज अभिनेता मेहमूद यांची बहीण, मीनू मुमताज यांचा जन्म 1942 मध्ये भारतात झाला. त्यांनी आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी वयाच्या 13 व्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली. मीनू यांना सात भावंडं होती आणि तिचे वडीलांना दारूचं व्यसन जडलेलं. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी खालावली की, मीनू यांना नोकरी शोधावी लागलेली.
तसं तर, मीनू मुमताज यांच्या आईला त्यांचं फिल्म्समध्ये काम करणं अजिबात पसंत नव्हतं. पण, वडिलांच्या पाठींब्यामुळे त्यांनी वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. त्यांनी 'घर घर में दिवाली' नावाची फिल्म केली, ज्यामध्ये त्या डान्सर दिसलेल्या, पण ही फिल्म फारशी चालली नाही. त्यानंतर त्यांनी 1956 मध्ये आलेल्या 'सखी हातिम'मध्ये डान्सर म्हणून काम केलं. पण, याच फिल्मपासून त्यांना ओळख मिळाली आणि लीड अॅक्ट्रेस म्हणून त्या 'ब्लॅक कॅट'मध्ये बलराज साहनीसोबत झळकल्या.
मीनू मुमताज यांच्यासाठी 'ब्लॅक कॅट' हा सिनेमा लकी ठरला आणि त्यानंतर त्या 1957 मध्ये आलेल्या 'दो रोटी', 'सी.आई.डी.', 'नया दौर' आणि 'हलाकू' या सिनेमांमध्ये झळकल्या. हे चित्रपट हिट झाले, पण त्यांना फक्त काही चित्रपटांमध्येच मुख्य अभिनेत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
पडद्यावर सख्ख्या भावासोबत रोमान्स केला अन्...
मीनू मुमताज यांच्यासाठी सर्व काही ठीक चाललं होतं, पण एका चित्रपटानं अभिनेत्रीचं आयुष्य पालटलं. 1958 मध्ये आलेल्या 'हावडा ब्रिज' चित्रपटानं वाद निर्माण केला. चित्रपटातील एका गाण्यात तिनं तिचा स्वतःचा सख्खा भाऊ मेहमूदसोबत रोमान्स केला. त्यावेळी, चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली होती, कारण लोकांनी असा दावा केला होता की, ते भाऊ-बहिणीच्या नात्याला कलंकित करतायत.
मेहमूद आणि मीनू दोघांनाही टीकेचा सामना करावा लागला. मीनूनं चित्रपटांपासून ब्रेक घेतला, दिग्दर्शक एस. अली अकबरशी लग्न केलं, देश सोडून परदेशात स्थायिक झाली. पुढे तिला अचानक ब्रेन ट्यूमर असल्याचे निदान झालं. तिनं आजारावर घेतले, परंतु अभिनेत्रीचं कॅनडामध्ये निधन झालं.
























