Bigg Boss OTT 2: फलक नाझ झाली बिग बॉस ओटीटी-2 ची पहिली कॅप्टन; बिग बॉसच्या घरात काय घडलं? जाणून घ्या...
बिग बॉस ओटीटी-2 च्या (Bigg Boss OTT 2) घरात काय काय घडलं? ते जाणून घेऊयात...
Bigg Boss OTT 2: बिग बॉस ओटीटी-2 (Bigg Boss OTT 2) हा शो सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. बिग बॉस ओटीटी-2 च्या पाचव्या दिवसाची सुरुवात जबरदस्त झाली. बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी 'बरेली वाले ठुमके' या गाण्यावर डान्स केला. बिग बॉस ओटीटी-2 च्या पाचव्या दिवशी बिग बॉसच्या घरात काय काय घडलं? ते जाणून घेऊयात...
बिग बॉसच्या घरातील स्पर्धक हे 'बरेली वाले ठुमके' डान्स करत असताना मनीषा राणी ही एकेठिकाणी शांत बसलेली दिसली. तर दुसरीकडे पूजा भट्ट (Pooja Bhatt) आणि पलक पुरस्वानी यांच्यातील वाद अचानक वाढल्याचे दिसले. यादरम्यान मनीषा राणीने पलकची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तर पलकने तिला उलट विचारले की, 'तू मलाच का टार्गेट केलेस?' तसेच या एपिसोडमध्ये फलक नाझ (Falaq Naaz) ही बिग बॉस ओटीटी-2 (Bigg Boss OTT 2) ची पहिली कॅप्टन झाली आहे.
View this post on Instagram
पूजा ही पलकसोबत झालेल्या वादाबद्दल म्हणते, 'आम्ही एका ग्रुपमध्ये राहतो. तुम्ही मोठ्या मॅडम आहात, असे तुम्ही सगळे मला म्हणता आणि मग तुम्ही मॅडमचा एक शब्दही ऐकत नाही.'
बिग बॉस ओटीटीच्या एपिसोडमध्ये दिसले की, पलकने सांगितले की, तिला फलकचे व्हाइब्स आवडतात, खरे तर फलक ही मैत्री करण्यासाठी पलककडे गेली होती.
बिग बॉस ओटीटी-2 मध्ये 'या' सेलिब्रिटींनी घेतला सहभाग
बिग बॉस ओटीटी-2मध्ये 13 स्पर्धकांनी सहभाग घेतली आहे. अविनाश सचदेव, पलक पुरसवानी, बेबिका धुर्वे, जिया शंकर, आलिया सिद्दीकी, फलक नाज, जिया शंकर, आकांक्षा पुरी, जैद हदीद, सायरस ब्रोचा, मनीषा रानी, अभिषेक मल्हान, पुनीत सुपरस्टार आणि पूजा भट्ट यांनी बिग बॉस ओटीटीमध्ये 13 मध्ये सहभाग घेतला आहे. जियो सिनेमा आणि व्ह्यूट सेलेक्टवर प्रेक्षक हा शो पाहू शकतात. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या शोमध्ये कोणते ट्वीस्ट अँड टर्न्स येणार आहेत? हे बघायला प्रेक्षक उत्सुक आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: