(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss Marathi House Visit : 50 दिवस 250 कामगार, यंदा सगळे चक्रव्यूहात अडकणार; बिग बॉसच्या घराची सफर 'माझा'वर
Bigg Boss Marathi House Visit : बिग बॉसच्या घरात आता लवकरच राडा सुरु होणार असून अवघ्या काही तासांची प्रतीक्षा उरली आहे. त्याआधी बिग बॉसच्या घराची झलक माझावर दाखवण्यात आली आहे.
Bigg Boss Marathi House Visit : शंभर दिवसांचा राडा ज्या घरात होणार आहे, ते घर आता स्पर्धकांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालंय. याच घरातमध्ये मागील 4 सिझनच्या स्पर्धकांनी राडा घातला होता. आता पुन्हा एकदा एक नवा कोरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi Season 5) घराची झलक एबीपी माझाच्या प्रेक्षकांना दाखवण्यात आली आहे.
बिग बॉसची यंदाची थीम ही चक्रव्यूह अशी आहे. त्यामुळे घरातील स्पर्धक यंदा चक्रव्यूहात अडकणार आहेत. तिच थीम लक्षात घेऊन स्पर्धकांसाठी बिग बॉसच्या घराची रचना करण्यात आली आहे. यासाठी जवळपास 50 दिवस जवळपास 250 कामगार काम करत होते. या सगळ्याची सफर एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी दाखवण्यात आली आहे.
बिग बॉसच्या घराची नवी थीम
आतापर्यंत बिग बॉसच्या घराला एक मराठमोळा साज होता. पण यंदा तो साज कुठेही पाहायला मिळत नाहीये. यंदा बिग बॉसचं घर ग्लॅमरस झालंय. त्यामुळे घरातले स्पर्धकही ग्लॅमरस असणार असल्याचं म्हटलं जातंय. बिग बॉसच्या या घराला ओमंग कुमार यांनी सजवलं आहे.
कसं आहे बिग बॉसचं घर?
बिग बॉसच्या घरात गार्डन एरिया दरवर्षीप्रमाणे तयार करण्यात आलाय. याच गार्डन एरियामध्ये स्विमिंग पूल सारख्या सुविधा आहेत. तसेच याच गार्डन एरियामध्ये एक वेगळी रुम देखील तयार करण्यात आली आहे. बिग बॉसच्या हॉलमध्ये किचन, डायनिंग टेबल अशा सगळ्या सुविधा आहे. दरम्यान बिग बॉसच्या घरात यंदा अनेक वेगवेगळ्या गोष्टी या आहेत, ज्यांचा टास्कशी संबंध असणार आहे.
हे स्पर्धक होणार सहभागी?
बिग बॉसकडून काही स्पर्धकांचे नॉन रिव्हिल प्रोमो देखील शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये गायक अभिजीत सावंत याच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्याचप्रमाणे एका परदेसी गर्लचा देखील प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे ही परदेसी गर्ल कोण असणार याची देखील उत्सुकता लागून राहिली आहे. अभिनेता शुभंकर तावडे देखील बिग बॉसच्या घरात सहभागी होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. कारण शुभंकरच्या सोशल मीडिया पोस्टवरुन तो घरात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच सोशल मीडिया स्टार अंकिता वालावलकर हिच्या देखील नावाची जोरदार चर्चा आहे.
रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार
काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस मराठी'चा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रोमोवरुन रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार असल्याचं स्पष्ट झालं. अशातच आता पुन्हा एकदा नव्या पर्वाचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश देशमुख यंदाचा सीझन वाजवायला सज्ज आहे.