फ्लोइंग पल्लू मिरवत साडीवाल्या काकूंची 'साडी नेसून' बिग बॉसमध्ये ग्रँड एन्ट्री! नेटकऱ्यांकडून अभिनंदन
Bigg Boss Marathi Season 5 : साडीवाल्या काकूंना बिग बॉसच्या घरात पाहून नेटकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. नेटकऱ्यांकडून काकूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Bigg Boss Marathi Seasion 5 : साडी नेसून हे कसं करावं? (How To Wear Saree?) आणि साडी नेसून ते कसं करावं? सांगता सांगता आता नेटकऱ्यांच्या लाडक्या साडीवाल्या काकूंनी थेट बिग बॉसच्या घरात ग्रँड एन्ट्री घेतली आहे. साडीवाल्या काकूंना बिग बॉसच्या घरात पाहून नेटकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. नेटकऱ्यांकडून काकूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) सीझन 5 ची प्रेक्षक आतुरनेनं वाट पाहत आहेत. अशातच आज रात्री कलर्स मराठीवर बिग बॉसच्या सोहळ्याचा ग्रँड प्रिमियर सोहळा पार पडणार आहे. यंदा बिग बॉसच्या घरात कोण-कोण जाणार? काय कल्ला होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच साडीवाल्या काकूंच्या एका रिलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कधी सोडी नेसून फोनवर कसं बोलावं? तर कधी साडी नेसून शांत कसं बसावं? असं सांगणाऱ्या साडीवाल्या काकूंनी आता थेट साडी नेसून बिग बॉसच्या घरात एन्ट्री कशी घ्यावी? हे सांगितल्यामुळे नेटकरी चकीत झाले आहेत.
कलर्स मराठीच्या ऑफिशिअल इन्स्टा पेजवर नेटकऱ्यांच्या लाडक्या साडीवाल्या काकूंचं रिल झळकलं आणि चर्चांना उधाण आलं. या रिलमध्ये साडीवाल्या काकूंनी बिग बॉसच्या घरामध्ये साडी नेसून ग्रँड एन्ट्री कशी घ्यावी? हे सांगितलं आहे. काकूंनी मस्त सिम्पल साडी विथ फ्लोइंग पल्लू लूक केला आहे. बिग बॉसच्या घरात त्या आत्मविश्वासानं वॉक करताना दिसत आहेत. एवढंच नाहीतर तसा सल्लाही त्यांनी त्यांच्या फॉलोअर्सना दिला आहे.
View this post on Instagram
रिलमध्ये काकू फॉलोअर्सना सांगतायत की, "बिग बॉसच्या घरात साडी नेसून ग्रँड एन्ट्री कशी करायची? हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. मस्त सिम्पल, सोबर साडी नेसा... फ्लोइंग पल्लू सोडा, आत्मविश्वास असू देत, तुमच्या चालण्यात आणि डोळ्यांमध्ये... चेहऱ्यावर छान स्माईल ठेवा, डोळ्यांनी सगळीकडे पाहा आणि ग्रेसफुली सोफ्यावर तुम्ही बसून घ्या. स्माईल नेहमी चेहऱ्यावर असून देत आणि सगळ्या गोष्टी तुम्ही अशा ग्रेसफुली करा."
आता जर तुम्हाला साडीवाल्या काकू माहिती नसतील, तर त्या नेमक्या कोण आहेत? असा प्रश्न पडलाच असेल. तर नेटकऱ्यांच्या लाडक्या साडीवाल्या काकू म्हणजे, सोशल मीडिया स्टार @karishma_dheeraj3. या हँडलवरुन साडी कशी नेसावी? किंवा साडी नेसल्यावर रोजच्या दैनंदिन जीवनातील कामं कशी करायची? हे त्या सांगतात. नेटकरी अनेकदा त्यांचा उल्लेख साडीवाल्या काकू असा करतात. यापूर्वी या कंटेटवरुन नेटकऱ्यांनी अनेकदा त्यांना ट्रोलही केलं आहे. पण, अचानक कलर्स मराठीच्या ऑफिशिअल इन्स्टा पेजवर झळकल्यामुळे साडीवाल्या काकूंची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, बिग बॉस मराठी सीझन 5 चा ग्रँड प्रीमियर आज पार पडणार आहे. त्यापूर्वी माध्यमांसोबतच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसाठी कलर्स मराठीकडून होम व्हिजिट ठेवण्यात आली होती. त्यावेळी माध्यमांचे प्रतिनिधी आणि त्यासोबतच सोशल मीडिया स्टार्सनी बिग बॉसच्या घराला भेट दिली. बिग बॉसचं लिविंग एरिया, बाल्कनी, कॅप्टन रूम, किचन असे संपूर्ण घराचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एवढंच नाहीतर बिग बॉसच्या घराची झलक दाखवणारे रिल्सही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इतर सोशल मीडिया स्टार्सप्रमाणेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर @karishma_dheeraj3 सुद्धा बिग बॉसच्या घराची झलक पाहण्यासाठी हजर होत्या. त्याचवेळी त्यांनी बिग बॉसच्या घरात साडी नेसून ग्रँड एन्ट्री कशी करायची? हे रिल केलं आहे.