Bigg Boss Marathi Season 5 : 'मलाही ते सगळं फेक वाटतंय, तिने पूर्ण त्याला गुंतवून टाकलंय'; निक्कीसोबतच्या नात्यावर अरबाजच्या वडिलांची प्रतिक्रिया
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात अरबाज आणि निक्कीच्या नात्यावर आता त्याच्या वडिलांचीही प्रतिक्रिया समोर आल्याचं पाहायला मिळतंय.
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमध्ये (Bigg Boss Marathi Season 5) स्पर्धकांनी आतापर्यंत बरेच राडे घातले आहे. यामध्ये एक नाव सगळ्यांसाठीच चर्चेचं असतं आणि ते नाव म्हणजे निक्की तांबोळी (Nikki Tamboli). निक्कीवर सध्या प्रेक्षकांचाही बराच रोष असल्याचं चित्र आहे. पण तिच्यासोबत असलेल्या अरबाजचा जास्त राग येतोय. कारण मागच्या आठवड्यात जेव्हा निक्की आणि त्याचं भांडण झालं तेव्हा घरातले सगळे त्याच्या बाजूने होते आणि आता त्या दोघांचं भांडणं मिटल्यावर तो पुन्हा घरातल्यांच्या विरोधात गेला. हे सगळं पाहून प्रेक्षकांनाही बरीच नाराजी व्यक्त केली.
या सगळ्यात त्याच्या आणि निक्कीच्या नात्याचीही जोरदार चर्चा झाली. पण बिग बॉस मराठीच्या घरातच तो कमिटेड असल्याचंही त्याने सांगितलं होतं. तरीही निक्की सोबतची त्याची जवळीक ही अनेकांना पटत नाहीये. यावर आता अरबाजच्या वडिलांनी देखील प्रतिक्रिया दिली असून या सगळ्यामध्ये निक्की अरबाजला गुंतवून ठेवतेय, असं त्याचं म्हणणं आहे. त्यांनी नुकतीच 7 स्टार मराठी या युट्युब चॅनलला मुलाखत दिली.
'तिने त्याला तिच्या चक्रव्युहात पूर्ण गुंतवून टाकलंय'
निक्की आणि अरबाजच्या नात्याविषयी बोलताना अरबाजच्या वडिलांनी म्हटलं की, 'अरबाजने मैत्रीच पुढे ठेवली पाहिजे. कारण त्याने एवढ्या मोठ्या शोमध्ये सांगितलं की, मी एंगेज आहे. त्यामुळे त्याने त्याच्या मतावर ठाम राहिलं पाहिजे. महाराष्ट्राची जनता सगळं बघतेय आणि ही जनता खूप प्रेमळ आहे. ही जनता खोटारडेपणा ऐकायला आणि बघायलाही आवडत नाही. त्यांना ते फेक वाटतं. मलाही कुठेतरी तसंच काहीसं वाटतंय.त्याने तसं केलं नाही पाहिजे. त्याने वैभव आणि जान्हवीसोबत त्याच्या गेम खेळला पाहिजे. कारण निक्की काय करते, ती अभिजीतकडे काहीतरी वेगळं बोलते, अरबाजला काहीतरी वेगळं बोलते. अरबाजला ती लांब पण करते आणि जवळही करतेय. म्हणजे तिने त्याला तिच्या चक्रव्युहात पूर्ण गुंतवून टाकलंय आणि ते दिसतंय.'
दरम्यान बिग बॉसच्या घरातली समीकरणं ही दिवसागणिक बदलताना दिसतायत. ग्रुप A आणि ग्रुप B यांच्यात आता चांगलीच फूट पडली असून प्रत्येकजण आता आपला वैयक्तिक खेळ खेळण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात आणखी काय काय पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.