Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या स्पर्धकांचं ट्रबल होणार डबल! सदस्यांची उडाली झोप, ‘उल्टा-पुल्टा’ रूमने घरात नवा ट्विस्ट
आता बिग बॉस घरात एका मोठ्या बदलाची घोषणा झाली आहे, जी संपूर्ण गेमच उलथापालथ करणारी ठरणार आहे.

Big Boss Marathi 6: कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी सिझन ६’ सध्या प्रेक्षकांना जबरदस्त मनोरंजन देत आहे. घरात दररोज नवे वाद, बॉण्डिंग, रणनिती आणि अनपेक्षित ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. प्रत्येक दिवसासोबत खेळ अधिकच रंगतदार होत असताना, आता बिग बॉस घरात एका मोठ्या बदलाची घोषणा झाली आहे, जी संपूर्ण गेमच उलथापालथ करणारी ठरणार आहे.आजच्या भागात प्रेक्षकांना एक मोठा धक्का बसणार आहे. बिग बॉसच्या घरात ‘उल्टा-पुल्टा’ रूमचं दार उघडणार आहे. ही रूम केवळ एक खोली नसून, ती खेळाचं गणित बदलणारी ताकद आहे. बिग बॉसने स्वतः सदस्यांना इशारा देत सांगितलं आहे की, “या आठवड्यात सदस्यांचं ट्रबल होणार डबल!”
घरात उघडणार ‘उल्टा-पुल्टा’ रूमचं दार
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरात रोज नवा दंगा, कल्ला आणि बॉण्डिंग पाहायला मिळत आहेत. घरात दररोज नवनवीन धक्के आणि जबरदस्त ट्विस्ट रंगात रंगत आहेत. खेळाचा प्रत्येक टप्पा सदस्यांसाठी आव्हानात्मक ठरत असतानाच, आता घरात एका अशा गोष्टीची एन्ट्री होणार आहे ज्यामुळे संपूर्ण गेमच बदलून जाणार आहे. आजच्या भागात प्रेक्षकांना एक मोठा बदल पाहायला मिळेल. घरामध्ये आता 'उल्टा-पुल्टा' रूमचं दार उघडणार आहे. या रूममध्ये अशी ताकद आहे की ती संपूर्ण खेळाचा नूर पालटून टाकू शकते. 'या आठवड्यात सदस्यांचं ट्रबल होणार डबल' असं म्हणत बिग बॉसने सदस्यांना इशाराच दिला आहे. बिग बॉस यांनी सदस्यांना सांगितले, " या रूममध्ये ताकद आहे अख्खा गेम उल्टा-पुल्टा करून टाकण्याची." कोणाचे कोणाशी असलेले नाते बिघडणार? कोणाचा खेळ मजबूत होणार? तर कोणाच्या अडचणी वाढणार? काही सदस्यांसाठी ही रूम संधी ठरणार की संकट, हे पाहणं नक्कीच रंजक ठरेल.
View this post on Instagram
घरात आधीच सुरू असलेल्या वादांमध्ये आणि रणनीतींमध्ये आता ‘उल्टा-पुल्टा’ रूममुळे अधिकच तणाव वाढताना दिसतोय. काही जण उत्साहात आहेत, तर काही जण या नव्या ट्विस्टमुळे अस्वस्थ झाल्याचं स्पष्ट जाणवत आहे. एक गोष्ट मात्र नक्की, ही रूम उघडल्यानंतर बिग बॉसच्या घरातील खेळ पूर्वीसारखा राहणार नाही.नक्की काय आहे हे ‘उल्टा-पुल्टा’ प्रकरण? कोणाचं नशीब फिरेल आणि कोणाचा खेळ धोक्यात येईल? हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका ‘बिग बॉस मराठी सिझन 6’, दररोज रात्री 8:०० वाजता, फक्त कलर्स मराठी आणि JioHotstar वर!























