कॅप्टन्सीच्या शर्यतीत दिव्याच्या क्षमतेवर घरच्यांचा डाउट; बिग बॉसच्या घरात नव्या वादाला निमंत्रण; दिव्यानंही बेधडकपणे सांगितलं ..
अनुभवाच्या जोरावर ती इतर सदस्यांच्या तुलनेत थोडी कमी पडते, असा सूर घरात उमटतो.

Bigg Boss Marathi: कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ सिझन 6 आता निर्णायक टप्प्यावर पोहोचताना दिसत आहे. दिवसेंदिवस वाढणारी स्पर्धा, बदलती समीकरणं आणि टोकाला गेलेले वाद यामुळे बिग बॉसचं घर अधिकच तापलं आहे. अशातच कॅप्टन्सीच्या शर्यतीमुळे घरात हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये दिव्याच्या कॅप्टन्सी क्षमतेवर घरातील सदस्यांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं स्पष्ट दिसतंय.
दिव्याच्या क्षमतेवर घरच्यांचे प्रश्न
प्रोमोमध्ये घरातील सर्व सदस्य कॅप्टन्सीच्या मुद्द्यावर एकत्र बसलेले असताना वातावरण चांगलंच तणावपूर्ण झालेलं दिसतं. अनुश्री थेटपणे म्हणते, “दिव्या कॅप्टन्सीसाठी पात्र नाही.” तर रुचिता आपलं मत मांडताना सांगते की, “कॅप्टन असा असावा, जो सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेईल.” याच मुद्द्यावर सुमित आणि सागरही आपली भूमिका स्पष्ट करतात. त्यांच्या मते दिव्याला अजून परिपक्वता आणि अनुभवाची कमतरता आहे. अनुभवाच्या जोरावर ती इतर सदस्यांच्या तुलनेत थोडी कमी पडते, असा सूर घरात उमटतो.
मात्र, या आरोपांवर दिव्या गप्प बसत नाही. उलट ती अधिक ठामपणे आपली बाजू मांडते. दिव्या म्हणते, “अनुभव जन्मत: कुणालाच नसतो. शिकत शिकतच तो मिळतो. तुम्ही सगळे जर माझ्या विरोधात असाल, तर मी एकटी तुमच्या सगळ्यांच्या विरोधात उभी राहायला तयार आहे!” दिव्याचा हा बेधडक आणि करारी पवित्रा पाहून घरात खळबळ उडते. तिच्या या वक्तव्यामुळे घरातील समीकरणं बदलणार का, असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलेला आहे.
View this post on Instagram
कॅप्टन्सीचा हा वाद केवळ एका पदापुरता मर्यादित न राहता, सदस्यांमधील मतभेद, अहंकार आणि रणनीती उघड करणारा ठरणार आहे. दिव्या एकटी संपूर्ण घराचा सामना करू शकेल का? की घरातील एकजूट तिच्या मार्गात अडथळा ठरणार? आणि अखेर कोणाच्या गळ्यात कॅप्टनपदाची माळ पडणार? आता दिव्या तिचे मुद्दे घरच्यांना पटवून देऊ शकेल का? की तिला या कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागेल? कोण बनणार घराचा कॅप्टन ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. पाहा ‘बिग बॉस मराठी’ सिझन ६, दररोज रात्री ८ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही JioHotstar वर.























