एक्स्प्लोर

Bigg Boss Actors Engagement Roumers: गौरव मोरेनंतर 'बिग बॉस'फेम जोडीचा साखरपुडा? अंगठीचा फोटो पाहताच चाहत्यांच्या भुवया उंचावल्या

त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एका फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

Entertainment News: मनोरंजनविश्वात कायम कोणाच्या ना कोणाच्या लग्नाची, प्रपोजलची, साखरपुड्याची चर्चा रंगलेली असते. अलीकडेच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम गौरव मोरेच्या सरप्राईज लग्नाची चर्चा रंगलेली असताना आता 'बिग बॉस 18' मधून (Bigg Boss 18) घराघरात लोकप्रीय झालेल्या एका जोडीच्या साखरपुड्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चा रंगण्याचं कारण म्हणजे अभिनेत्री इशा सिंगने (Esha Singh) शेअर केलेला फोटो. या फोटोमुळे अभिनेत्री ईशा सिंग आणि अविनाश मिश्रा (Avinash Mishra) यांनी गुपचूप साखरपुडा केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

ईशा अविनाशने खरंच केला साखरपुडा?

'बिग बॉस 18' (Bigg Boss 18) या रिॲलिटी शोमुळे चर्चेत आलेले ईशा सिंग आणि अविनाश मिश्रा पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यावेळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एका फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. यापूर्वीही त्यांच्या नात्याबद्दल बरीच चर्चा झाली होती, पण आता नव्याने समोर आलेल्या एका फोटोमुळे त्यांच्या साखरपुड्याच्या अफवांना पुन्हा एकदा जोर आला आहे.मात्र, अद्याप त्या दोघांपैकी कोणाकडूनही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

खरं तर, ईशा सिंग आणि अविनाश मिश्रा यांनी आपापल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ते एकमेकांचा हात धरून दिसत आहेत. या फोटोमध्ये त्यांच्या हातात अंगठ्या दिसत असल्याने, चाहत्यांनी त्यांचा साखरपुडा झाल्याचा अंदाज लावला आहे.हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून,नेटकरी  त्यावर  प्रतिक्रिया देत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

 

 अफेअरच्या सर्व अफवा फेटाळून लावलेल्या

ईशा सिंग आणि अविनाश मिश्रा यांची पहिली भेट बिग बॉस 18 च्या घरात झाली होती. शो दरम्यान त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यामुळेच शो संपल्यानंतरही त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चा सुरूच होत्या.मात्र, ईशा सिंगने एका मुलाखतीत या सर्व अफेअरच्या अफवा फेटाळून लावल्या होत्या आणि अविनाशला आपला केवळ एक चांगला मित्र म्हटले होते.

‘बिग बॉस 18’मध्ये अविनाश तिसरा रनर-अप ठरला होता, तर ईशा सहाव्या क्रमांकावर होती. शो संपल्यानंतरही दोघांमधील मैत्री तशीच टिकून आहे. म्युझिक व्हिडिओ आणि ट्रॅव्हल फोटोंच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांशी सातत्याने कनेक्ट ठेवला आहे. ‘नागिन 7’सारख्या मालिकेत ईशा झळकली होती. दरम्यान, सध्या चर्चेत असलेली ही अंगठी खरंच त्यांच्या नात्यातील पुढच्या टप्प्याची चाहूल आहे की एखाद्या नव्या प्रोजेक्टचा भाग आहे, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget