Bigg Boss Pranit More:'यालाच म्हणतात मराठमोळे संस्कार...'; घरात अश्नूरचे वडील येताच प्रणीत मोरेनं जे केलं, त्याचं होतंय सर्वत्र कौतुक, नेमकं काय घडलंय?
या सगळ्यात चाहतांचे लक्ष एका वेगळ्याच गोष्टीकडे गेलं . घरात अशनूरचे वडील येताच प्रणित मोरेनं (Pranit More) जे केलं त्याचं सर्वत्र कौतुक होतंय .

Bigg Boss 19 Pranit More: बिग बॉसच्या घरात सध्या फॅमिली वीक सुरू आहे.स्पर्धकांच्या कुटुंबातील सदस्य बिग बॉसच्या (Bigg Boss 19) घरात हजेरी लावताना दिसतायत.त्यामुळे सध्या घरातील वातावरण आनंददायी आणि भावनिक झालंय. इतक्या दिवसानंतर कुटुंबातील सदस्यांना पाहून स्पर्धकांना सुखद धक्का बसला आहे. एरवी कुठल्याही कारणाने एकमेकांशी हुज्जत घालणारे बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांचा नूरच पालटला होता. प्रत्येकाला आपापल्या नातेवाईकांना भेटण्याची ओढ लागली होती. आपल्या जवळच्या लोकांना घरात आलेलं पाहून अनेकांचे डोळे पाणवले.या सगळ्यात चाहतांचे लक्ष एका वेगळ्याच गोष्टीकडे गेलं. घरात अशनूरचे वडील येताच प्रणित मोरेनं (Pranit More) जे केलं त्याचं सर्वत्र कौतुक होतंय. सोशल मीडियावर त्याने केलेल्या कृतीचा व्हिडिओ ही सध्या व्हायरल होतोय.
बिग बॉसच्या घरात नेमकं घडलं काय ?
बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना सध्या सुखद धक्का बसलाय.आपल्या कुटुंबातील सदस्यांची भेट स्पर्धकांना भावनिक करून गेली. गौरव खन्नाची पत्नी अश्रुव कौरचे वडील तर कुनीकाच्या नाती बिग बॉसच्या घरात भेटण्यासाठी आल्या होत्या. सध्या हे हृदयस्पर्शी क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रत्येकाचे आपापल्या कुटुंबीयांना भेटून डोळे पाणावले होते.दरम्यान प्रणित मोरेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.अशनूरचे वडील बिग बॉसच्या घरात येताच त्यांनी अर्थात आधी अशनूरची भेट घेतली.नंतर ते घरातील सदस्यांनाही भेटले. प्रत्येकाने जिव्हाळ्यानं अश्रूरच्या वडिलांची भेट घेतली.इतर सदस्यांना भेटून झाल्यानंतर जेव्हा प्रणित मोरेची आणि अशनूरच्या वडिलांची भेट झाली तेव्हा प्रणितने आपल्या मराठमोळ्या पद्धतीनं त्यांना नमस्कार केला. नंतर मिठी मारली.याचा एक व्हिडिओ चाहत्याने शेअर केला असून 'माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचे संस्कार त्याला उंच नेतात..' असं या व्हिडिओवर लिहिलं आहे. यावर अनेक चाहत्यांनी मराठी संस्कृती झोपल्याचं सांगत प्रणितचं कौतुक केलं आहे.अनेकांनी प्रणितच बिग बॉसचा विनर होणार असल्याचं म्हटलं.
View this post on Instagram
बिग बॉस 19 चा शेवट कधी ?
बिग बॉसच्या सीजन 19 चा आता शेवट जवळ आला आहे.7 डिसेंबर 2025 रोजी म्हणजेच रविवारी हा फिनाले होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या घरातील सदस्यांमध्ये प्रणित मोरे, अशनूर कौर, शाहबाज बदेशा, गौरव खन्ना, अमल मालिक, तान्या मित्तल, कुनिका सदानंद आणि मालती चहर यांचा समावेश आहे. मालती आणि शहाबाज यांना वाइल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली होती.आता या हंगामाचा विजेता पुढील महिन्यात जाहीर होईल.























