Munawar Faruqui : मुनव्वर फारुकीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ? 10-12 दिवसांपूर्वीच गुपचूप लग्न उरकल्याची माहिती
Munawar Faruqui : बिग बॉस 17चा स्पर्धक मुनव्वर फारुकी संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुनव्वरने गुपचूप लग्न उरकल्याचं सांगण्यात येत आहे.

Munawar Faruqui : बिग बॉस 17च्या घरात मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सर्वाधिक चर्चेत राहिला होता. त्यातच तो रुग्णालयात दाखल असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. पण आता त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, मुनव्वरने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली असल्याची माहिती समोर आली आहे.
आपल्या वैयक्तिक आयुष्यासंदर्भात मुनव्वरने अनेक अफवा बिग बॉसच्या घरात पसरवल्या असल्याचं म्हटलं जातं. त्यातच उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केल्याची देखील माहिती समोर आली होती. पण आता त्याने 10 ते 12 दिवसांपूर्वीच दुसरं लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. असं देखील सांगण्यात येत आहे की, या लग्नाला केवळ त्याच्या जवळच्या नातेवाईकांना आमंत्रित करण्यात आलं होतं.
म्हणून लग्नाविषयी कोणताही माहिती नाही
टाईम्स नाऊच्या रिपोर्ट्सनुसार, सोशल मीडियावरील एका पेजने मुनव्वरच्या दुसऱ्या लग्नाविषयी माहिती दिली आहे. पण मुनव्वरच्या टीमकडून यासंदर्भात कोणत्याची प्रकारची अपडेट देण्यात आली नाहीये. पण टाईम्स नाऊच्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आलं आहे की, होय मुनव्वरने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. पण त्याला ही गोष्ट अद्याप सोशल करायची नाही, त्यामुळे त्याने कोणतेही फोटो देखील शेअर केलेले नाहीत.
View this post on Instagram
कोणाशी बांधली लग्नगाठ?
दरम्यान सोशल मीडियावर असा देखील दावा केला जात आहे की, मुनव्वर फारुकीने जिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे, तिचं नाव महजबीं कोटवाला असं आहे आणि ती एक मेकअप आर्टिस्ट आहे. दरम्यान रिपोर्ट्सनुसार, असं देखील सांगितलं जात आहे की, मुनव्वरच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी ही 26 मे रोजी आयटीसी ग्रँड मराठा येथे ठेवण्यात आली होती.
हिना खान पोहचली मुनव्वरच्या लग्नाला?
रिपोर्ट्नुसार, हिना खानने देखील मुनव्वरच्या लग्नाला हजेरी लावली असल्याची माहिती देण्यात आली आहे. हिना खानने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये मेरे यार की शादी हैं असं गाणं त्या पोस्टला लावलं होतं. त्यामुळे मुनव्वरच्या लग्नाला हिनाने हजेरी लावली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

