Filmfare Awards 2024: 'सॅम बहादुर' आणि 'अॅनिमल' चा डंका तर शाहरुखचा 'जवान' ठरला सर्वोत्कृष्ट ॲक्शन चित्रपट; जाणून घ्या फिल्मफेअर पुरस्कार विजेत्यांची नावं
Filmfare Awards 2024: फिल्मफेअर पुरस्कार सोहळा यावेळी गुजरातमधील (Gujarat) गांधी नगर (Gandhi Nagar) येथे आयोजित करण्यात आला आहे. जाणून घेऊयात फिल्मफेअर पुरस्कार विजेत्यांची नावे...

Filmfare Awards 2024: फिल्मफेअर पुरस्कार सोहळा (69th Filmfare Awards 2024 ) हा 27 जानेवारीपासून सुरू झाला आहे. यावेळी हा पुरस्कार सोहळा गुजरातमधील (Gujarat) गांधी नगर (Gandhi Nagar) येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या काही कॅटेगिरीमधील पुरस्कारांच्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्याचबरोबर इतर कॅटेगिरीतील विजेत्यांची नावे आज (रविवार) जाहीर करण्यात येणार आहेत. जाणून घेऊयात फिल्मफेअर पुरस्कार विजेत्यांची नावे...
'जवान' ठरला सर्वोत्कृष्ट ॲक्शन चित्रपट
शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाने वर्षी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. प्रेक्षकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. या चित्रपटाला यावर्षीच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामधील सर्वोत्कृष्ट ॲक्शन चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच सर्वोत्कृष्ट व्हीएफएक्स या कॅटेगिरीतील पुरस्कार देखील या चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे.
View this post on Instagram
रणबीरच्या 'ॲनिमल'नं पटकावला पुरस्कार
रणबीर कपूरच्या ॲनिमल या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर या कॅटेगिरीमधील पुरस्कार जिंकला आहे. याशिवाय, सर्वोत्कृष्ट साउंड डिझाईन या कॅटेगिरीतील फिल्मफेअर पुरस्कार देखील ॲनिमल चित्रपटाने पटकावला आहे.
View this post on Instagram
सॅम बहादुर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट वेशभूषा या श्रेणीतील फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाइन आणि सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइनचा पुरस्कारही सॅम बहादुर या चित्रपटाला मिळाला आहे.
अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंह यांच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातील व्हॉट झुमका या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा पुरस्कार गणेश आचार्य यांना मिळाला आहे. याशिवाय विधू विनोद चोप्राच्या 12वी फेल या चित्रपटालाही फिल्मफेअरमध्ये पुरस्कार मिळाला आहे. 12वी फेल या चित्रपटाला उत्कृष्ट संपादन या कॅटेगिरीतील पुरस्कार देण्यात आला आहे. आता आज फिल्मफेअर पुरस्काराच्या इतर कॅटेगिरीच्या विजेत्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.
करण जोहर, नुसरत भरुचा, जान्हवी कपूर, गणेश आचार्य आणि करिश्मा तन्ना या कलाकारांनी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.























