'सैराट'चा परशा राजकीय मैदानात उतरणार? आकाश ठोसर लातूरच्या काँग्रेस रॅलीमध्ये, PHOTO व्हायरल
Actor Akash Thosar Leads Congress Rally: आकाश ठोसरने लातूरमध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रचार रॅलीत भाग घेतला, ज्यामुळे स्थानिक नागरिकांचा उत्साह वाढला.

Actor Akash Thosar Leads Congress Rally: सध्या सर्वत्र महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. नऊ वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकांमध्ये प्रचाराचा शेवटचा दिवस आज सायंकाळपर्यंत ठरला आहे. दहा दिवसांच्या जोरदार प्रचारानंतर पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यांतून जनतेला आश्वासने दिली. तसेच मतदारांना प्रभावित करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. प्रचारासाठी स्टार प्रचारक देखील मैदानात उतरे होते. अभिनेत्री रवीना टंडन यांनी देखील शिवसेनेच्या प्रचारासाठी उपस्थिती दाखवली.
लातूरमध्ये प्रचार रॅलीत ग्लॅमरचा तडका
याच पार्श्वभूमीवर, लातूरमध्ये आज अभिनेता आकाश ठोसरचा प्रचार रॅलीत ग्लॅमरचा तडका पाहायला मिळाला. सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी उतरला असल्याचं पाहायला मिळालं.आज लातूर येथे काँग्रेस पक्षाची रॅली निघाली होती. या प्रचाराच्या रॅलीत अभिनेता आकाश ठोसर चर्चेचा केंद्रबिंदु ठरला. लातूरमधील ग्रामीण भागात अभिनेत्यानं काँग्रेस पक्षाचा प्रचार केला. त्यानं सनरूफ चारचाकीतून प्रवास करत प्रचार केला. सध्या या प्रचाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.
आकाश ठोसरला पाहण्यासाठी स्थानिक परिसरात गर्दी
प्रभाग एकचे अॅड. गोपाळ बुरबुरे या काँग्रेस पक्षातील उमेदवारासाठी लातूरच्या ग्रामीण भागातून प्रचाराची रॅली निघाली होती. या रॅलीमध्ये असंख्य पक्षातील कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. दरम्यान, आकाश ठोसरमुळे ही प्रचार रॅली लक्षवेधी ठरली. दरम्यान, आकाश ठोसरला पाहण्यासाठी स्थानिक परिसरात गर्दी केली होती. आकाश ठोसरला सैराट चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली होती. संपूर्ण महाराष्ट्राला वेड लागलं होतं. दरम्यान, आकाश ठोसर काँग्रेस पक्षाच्या प्रचार रॅलीत दिसल्यामुळे अनेकांच्या भुवाय उंचावल्या आहेत. आकाश ठोसरला रॅलीत पाहून नागरिकांचा उत्साह वाढला.
रविंद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर रितेश देशमुख यांची प्रतिक्रिया
काही दिवसांपूर्वी लातूर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली होती. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. लातूरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध केला. 'लातूर शहरातून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील', असं रविंद्र चव्हाण म्हणाले होते. यावर विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि अभिनेता रितेश देशमुख यांनी मोजक्या शब्दांत सणसणीत उत्तर दिलं. या व्हिडिओवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी समर्थन दर्शवलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
























