Bhojpuri film wanted: 'वांटेड' सिनेमाच्या निर्मात्याच्या अडचणीत वाढ; मुंबईच्या अंधेरी परिसरातून अटक, फसवणुकीचा गुन्हा दाखल
Bhojpuri film wanted: भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह यांच्या चित्रपटाच्या निर्मात्याला मुंबईतून अटक.

Bhojpuri film wanted Producer: भोजपुरी सिनेसृष्टी (Bhojpuri Film Industry) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह (Pawan Singh) यांच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी. पवन सिंह यांच्या चित्रपटाच्या निर्मात्याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांची ही एक मोठी कारवाई मानली जात आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी अंधेरी पश्चिम परिसरात ही मोठी कारवाई केली आहे. भोजपुरी अभिनेता पवन सिंह यांच्या 'वांटेड' (Wanted) चित्रपटाचे निर्माते जसवंत कुमार यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर चित्रपटासाठी फायनान्सच्या नावाखाली एका गुंतवणूकदाराकडून 78 लाख घेतल्याचा गंभीर आरोप आहे. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
भोजपुरी अभिनेता पवन सिंह यांच्या 'वॉन्टेड' चित्रपटाचे निर्माते जसवंत कुमार यांना अटक (Bhojpuri film wanted Producer Jaswant Kumar Arrested)
मिळालेल्या माहितीनुसार, भोजपुरी अभिनेता पवन सिंह यांच्या 'वांटेड' चित्रपटाचे निर्माते जसवंत कुमार यांच्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरातून अटक केली आहे. सिनेमाच्या फायनान्सच्या नावाखाली एका गुंतवणूकदाराकडून 78 लाख रुपये घेतले असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दरम्यान, तक्रारदाराने चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही पैसे परत न दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
दरम्यान, या प्रकरणी वाराणसीमधील चोलापूर पोलीस ठाण्यात सिनेमाचे निर्माते जसवंत कुमर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेली तीन वर्षे तपासात आरोपीने सहकार्य न केल्याने न्यायालयाने NBW (नॉन-बेलेबल वॉरंट) जारी केले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी अंधेरी पश्चिममधील वीरा देसाई रोड परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. अंधेरी न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड मिळवल्यानंतर आरोपीला पुढील तपासासाठी उत्तर प्रदेशला रवाना केले आहे.
हे प्रकरण उघडकीस येताच, उत्तर प्रदेश, वाराणसी चोलापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, फिल्म निर्मात्याकडून अशा पद्धतीचे फसवणूक होत असल्यामुळे गुंतवणूकदारामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे प्रकरण उघडकीस येताच, पोलिसांनी अधिक तपासाला सुरुवात केली असून, या प्रकरणी आता पुढे नेमकं काय घडत आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, हे प्रकरण उघड होताच भोजपूरी सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला























