2 तास 1 मिनिटांची हॉरर फिल्म... ज्या चित्रपटाचा प्रत्येक सीन अंगावर आणतो काटा, बॅक टू बॅक ट्विस्ट; भंडावून सोडते स्टोरी
Best Horror Movie: काही चित्रपट कितीही जुने झाले तरी चाहते त्यांना विसरू शकत नाहीत. 2003 मध्ये असाच एक हॉरर बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यानं सर्वांना हादरवून टाकलं.
Best Horror Movie: दररोज वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट प्रदर्शित होत असतात. हॉरर मूव्ही (Horror Movie) पाहण्यात एक वेगळाच आनंद असतो. एकामागून एक असे जे ट्विस्ट येत असतात, जे चाहत्यांच्या अंगावर शहारे आणतात. अनेक सीन्स तर पुरते हादरवून सोडतात. 2003 मध्ये असाच एक हॉरर चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात बॉलिवूडची तगडी स्टारकास्ट झळकली होती. अगदी सैफ अली खानपासून (Saif Ali Khan) शिल्पा शेट्टीपर्यंत (Shilpa Shetty) बॉलिवूडचे (Bollywood Celebrity) मोठमोठे स्टार्स या चित्रपटात दिसले. जर तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल आणि तुम्ही हॉरर चित्रपटांचे चाहते असाल, तर हा चित्रपट एकदा तरी नक्की पाहा.
आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, त्याचं नाव 'डरना मना है'. या चित्रपटाच्या कथेनं लोकांना खूप घाबरवलं. रिलीज होऊन अनेक वर्ष उलटली तरीसुद्धा, या चित्रपटाचं नाव बॉलिवूडच्या लोकप्रिय हॉरर चित्रपटांमध्ये समाविष्ट आहे.
'या' हॉरर चित्रपटाला तोड नाही
'डरना मना है' हा चित्रपट प्रवल रमण यांनी दिग्दर्शित केलेला असून त्याचे निर्माते राम गोपाल वर्मा होते. या चित्रपटात सैफ अली खान आणि शिल्पा शेट्टी यांच्या व्यतिरिक्त विवेक ओबेरॉय, संजय कपूर, नाना पाटेकर, आफताब शिवदासानी आणि समीरा रेड्डी सारखे कलाकार झळकले होते. या चित्रपटाला IMDb वर 10 पैकी 6.3 रेटिंग मिळालं आहे.
'डरना मना है'ची कहाणी नेमकी काय?
'डरना मना है' रिलीज झाला आणि तो पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. या चित्रपटाचं कथानक रात्रीचा अंधार आणि एका गाडीभोवती फिरतं. या गाडीतून अनेकजण प्रवास करत असतात. पण, रस्त्यात अचानक गाडी बंद पडते आणि इथूनच चित्रपटाची खरी कहाणी सुरू होते. त्यानंतर पुढे एकापाठोपाठ एक ट्वि्स्ट येत राहतात. पुढे गाडीत बसलेल्या माणसाकडून कोणीतरी लिफ्ट मागतो आणि काही वेळाने तो मरतो. त्यात आश्चर्याची बाब म्हणजे, लिफ्ट मागितल्यानंतर तो माणूस स्वतःच सांगतो की, तो भूत आहे. पण, गाडी चालवणारा त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही, दुर्लक्ष करतो.
बजेटपेक्षा जास्त कमावले
'डरना मना है' चित्रपटाचं बजेट सुमारे 4 कोटी रुपये होतं. पण कमाईच्या बाबतीत हा चित्रपट खूप पुढे गेला. या चित्रपटानं सुमारे 9 कोटी रुपये कमावले होते. अद्भुत कथेसोबतच चित्रपटातील सर्व पात्र लोकांना खूप आवडली. 'डरना जरूरी है' हा चित्रपट 'डरना मना है' या चित्रपटाला मिळालेला लोकांचा प्रतिसाद पाहून बनवण्यात आला होता. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :