Bappi Lahiri : बप्पी लाहिरी यांच्यावर उद्या होणार अंत्यसंस्कार ; महेंद्र वर्मा यांची माहिती
Bappi Lahiri : बप्पी लाहिरी यांचे नातेवाईक महेंद्र वर्मा यांनी माहिती दिली आहे.
Bappi Lahiri : जवळपास पाच दशके आपल्या संगीताने आणि आवाजाने बॉलिवूडवर छाप सोडणारे ज्येष्ठ संगीतकार व गायक बप्पी लाहिरी (Bappi Lahiri ) यांचे काल रात्री निधन झाले. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आलोकेश लाहिरी असे बप्पी यांचे मूळ नाव होते. बप्पी लाहिरी यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत, अशी माहिती दिग्दर्शक आणि बप्पी लाहिरी यांचे नातेवाईक महेंद्र वर्मा यांनी दिली आहे.
महेंद्र वर्मा यांनी सांगितलं की, 'बप्पी लाहिरी यांच्यावर आज नाही तर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचा मुलगा अमेरिकेहून आज रात्री दोन वाजता येणार आहे. उद्या पवनहंस जवळील एका स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. '
बप्पी लाहिरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला. 1973 साली त्यांनी नन्हा शिकारी या चित्रपटापासून बॉलिवुडमधील करीअरला सुरुवात केली. बप्पी लाहिरींना संगीताचं सुरुवातीची शिक्षण आपल्या घरातच मिळालं. वयाच्या 17 वर्षापासूनच बप्पी लाहिरी हे संगीतकार होण्याचं ठरवलं होतं. तीन वर्षाचे असल्यापासून ते तबला वादन शिकले त्यांची प्रेरणा होते एसडी बर्मन. एसडी बर्मन यांची गाणी ऐकूण ते रियाज करायचे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- PM Modi on Bappi Lahiri : 'जिंदादिल बप्पी लाहिरींच्या निधनानं दु:खी झालोय'; आठवण शेअर करत पंतप्रधान मोदींच्या भावना
- PHOTO : 'सोन्या'सारखा माणूस गेला! अलोकेश लाहिरी ते लाडके 'बप्पीदा'; जीवनप्रवास कसा होता?
-
Remembering Bappi Lahiri : बप्पी लाहिरी यांचं निधन; मुंबईत घेतला अखेरचा श्वास