एक्स्प्लोर

Harshi Rasanga Complaint By Cricketer Bhanuka Rajapaksa: दिग्गज क्रिकेटरच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अभिनेत्रीला केली अटक; जबाब देताच पोलिसही चक्रावले, नेमकं प्रकरण काय?

Harshi Rasanga Complaint By Cricketer Bhanuka Rajapaksa: श्रीलंकेचा क्रिकेटपटू भानुका राजपक्ष यानं अभिनेत्री हर्षी रसंगा हिला कायदेशीर नोटीस पाठवली होती.

Harshi Rasanga Complaint By Cricketer Bhanuka Rajapaksa: एका सोनसाखळी चोरीच्या प्रकरणात (Case Linked To Gold Chain) प्रसिद्ध अभिनेत्रीला (Actress) अटक करण्यात आली आहे. सुप्रसिद्ध क्रिकेटरनं अभिनेत्रीला कायदेशीर नोटीस धाडल्यानंतर पोलिसांनी अभिनेत्रीला अटक (Actress Arrested) केली आहे. क्रिकेटपटून धाडलेल्या नोटीसमध्ये सांगण्यात आलंय की, क्रिकेटपटून अभिनेत्रीला तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यासाठी एक सोन्याची साखळी दिली होती. मात्र, त्या अभिनेत्रीनं क्रिकेटपटूला कोणतीही कल्पना न देता, 9 लाखांची ही सोनसाखळी गहाण ठेवली. दुसरीकडे, माध्यमांमध्ये बोलताना मात्र, या अभिनेत्रीनं या घटनेची पूर्णपणे वेगळीच बाजू मांडलीय.

श्रीलंकेचा क्रिकेटपटू भानुका राजपक्ष (Sri Lankan Cricketer Bhanuka Rajapaksa) यानं अभिनेत्री हर्षी रसंगा (Harshi Rasanga) हिला कायदेशीर नोटीस (Legal Notice) पाठवली होती, ज्यानंतर पोलिसांनी त्या अभिनेत्रीला अटक (Actress Arrested) केली. हे प्रकरण एका सोन्याच्या साखळीशी संबंधित आहे. राजपक्ष यानं नोटीसमध्ये सांगितलंय की, त्यानं ती सोन्याची साखळी अभिनेत्री हर्षी हिला केवळ तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यासाठी दिली होती. मात्र, त्या अभिनेत्रीनं राजपक्ष याला कोणतीही पूर्वकल्पना न देता, 9 लाख रुपयांची ही सोन्याची साखळी गहाण ठेवली. क्रिकेटर भानुका राजपक्ष यानं कायदेशीर नोटीस धाडल्यानंतर अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे. 

कडुवेला दंडाधिकारी न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, हर्षी रसंगा हिनं आपण क्रिकेटपटू भानुका राजपक्ष (Bhanuka Rajapaksa) याला न कळवता ती साखळी गहाण ठेवल्याचं कबूल केलंय. आपल्या वकिलांमार्फत हर्षीनं ती साखळी परत करण्याचं आश्वासन दिलंय. मात्र, जामीन मिळाल्यानंतर त्या अभिनेत्रीनं यु-टर्न घेतला आणि या घटनेबाबत पूर्णपणे विसंगत अशीच माहिती पुन्हा मांडली. 

अभिनेत्रीला जामीन मंजूर (Actress Granted Bail)

न्यायालयानं अभिनेत्री हर्षी रसंगाला प्रत्येकी 5,00,000 रुपयांचं दोन वैयक्तिक जामीन सादर केल्यानंतर जामीन मंजूर केला. दरम्यान, जामीनावर सुटका झाल्यानंतर, या अभिनेत्रीनं सोशल मीडियावर जे वक्तव्य केलंय त्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीनं सांगितलं की, क्रिकेटर भानुका राजपक्ष आणि तिचे प्रेमसंबंध होते. ती सोनसाखळी भानुका राजपक्ष यानंच अभिनेत्रीला भेट म्हणून दिलेली. अभिनेत्रीच्या वक्तव्यावर क्रिकेटपटू हर्षी रसंगानं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कडुवेला दंडाधिकारी न्यायालयानं थलंगमा पोलिसांना या खटल्याच्या पुढील सुनावणीदरम्यान ती सोन्याची साखळी न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, या खटल्याची पुढील सुनावणी 22 एप्रिल रोजी आहे.

भानुका राजपक्ष यानं IPL खेळलीय... (Cricketer Bhanuka Rajapaksa)

भानुका राजपक्ष यानं श्रीलंकेच्या क्रिकेट संघासाठी 5 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) आणि 45 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, या दोन्ही प्रकारांमध्ये अनुक्रमे 89 आणि 744 धावा केल्या आहेत. त्यानं आपला शेवटचा एकदिवसीय सामना 2021 मध्ये, तर शेवटचा टी-20 सामना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये खेळला होता. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) त्यानं 'पंजाब किंग्स'कडून दोन सीझन्स खेळले होते. 2022 च्या हंगामात, त्यानं 9 सामने खेळून 206 धावा केल्या होत्या. 2023 मध्ये, त्यानं केवळ 4 सामने खेळले आणि एकूण 71 धावांचीच नोंद केलेली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Sonali Bendre Goldie Behl News: अभिनेत्री सोनाली बेंद्रे अडचणीत; पुण्यातील मावळच्या 30 गुंठे जागेचा वाद कोर्टात, स्थानिक शेतकऱ्याचे गंभीर आरोप

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Embed widget