एक्स्प्लोर

West Bengal Election: बंगालच्या सीएम ममता बॅनर्जींची राजकीय सल्लागार कंपनी I-PAC वर तीन महिन्यात दुसऱ्यांदा EDची छापेमारी; ऐन निवडणुकीत कारवाई

कंपनीचे सह-संस्थापक आणि संचालक ऋषी राज सिंग यांच्या कार्यालयाचाही या कारवाईत समावेश आहे. आय-पॅक पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षासाठी निवडणूक व्यवस्थापनाचे काम पाहते.

West Bengal Election: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आज (2 एप्रिल) तीन महिन्यात दुसऱ्यांदा राजकीय सल्लागार कंपनी आय-पॅकच्या (I-PAC) तीन ठिकाणी छापे टाकले. हे पथक कंपनीच्या दिल्ली, बंगळूर आणि हैदराबाद येथील कार्यालयांमध्ये कारवाई करत आहे. अधिकाऱ्यांनीहे छापे कोळसा चोरी आणि घोटाळ्याच्या प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे बंगालमध्ये निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असतानाच ईडी सुद्धा सक्रिय झाली आहे. कंपनीचे सह-संस्थापक आणि संचालक ऋषी राज सिंग यांच्या कार्यालयाचाही या कारवाईत समावेश आहे. आय-पॅक पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षासाठी निवडणूक व्यवस्थापनाचे काम पाहते.

तीन महिन्यात दुसऱ्यांदा छापेमारी

अनेक कोटी रुपयांच्या कोळसा चोरी घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंगचे कथित आरोप आय-पॅक आणि संचालकावर आहेत. सीबीआयने या प्रकरणात 27 नोव्हेंबर 2020 रोजी एफआयआर दाखल केला होता. यामध्ये गुंतलेली एकूण रक्कम अंदाजे 2742 कोटी रुपये आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात, ईडीने आय-पॅकच्या कोलकाता येथील कार्यालयावर आणि संचालक प्रतीक जैन यांच्या घरावर छापे टाकले होते. अलीकडेच, ईडीने सिंग आणि जैन यांना त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावले होते. या नोटिसा रद्द करण्यासाठी दोघांनीही दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ते म्हणतात की ते बंगाल आणि तामिळनाडूतील निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत.

8 जानेवारी रोजी अंमलबारी संचालनालयाच्या (ईडी) एका पथकाने कोलकातामधील गुलडॉन स्ट्रीटवरील प्रतीक जैन यांच्या निवासस्थानी आणि दुसऱ्या पथकाने सॉल्ट लेकमधील त्यांच्या कार्यालयावर छापा टाकला. जैन ममता बॅनर्जी यांच्यासाठी राजकीय रणनीती तयार करतात. सकाळी सहा वाजता छापा सुरू झाला, पण नंतर साडे अकराच्या सुमारास प्रकरण अधिक चिघळले. कोलकाता पोलीस आयुक्त प्रतीक यांच्या निवासस्थानी सर्वात आधी पोहोचले. त्यानंतर थोड्याच वेळात, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः त्यांच्या लाउडन स्ट्रीटवरील निवासस्थानी पोहोचल्या. ममता तिथे काही वेळ थांबल्या. जेव्हा त्या बाहेर आल्या, तेव्हा त्यांच्या हातात एक हिरवी फाईल दिसली. त्यानंतर त्यांनी आय-पॅक (I-PAC) कार्यालयाला भेट दिली. 

आय-पॅक कंपनीची पार्श्वभूमी काय?

  • आय-पॅक (इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटी) ही एक राजकीय सल्लागार संस्था आहे. प्रतीक जैन संचालक आहेत.
  • ही संस्था राजकीय पक्षांना निवडणूक रणनीती, डेटा-आधारित प्रचार मोहीम, माध्यम नियोजन आणि मतदार संपर्कासाठी मदत करते.
  • आय-पॅक (I-PAC) पूर्वी सिटिझन्स फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्स (CAG) म्हणून ओळखले जात होते. 
  • स्थापना 2013 मध्ये प्रशांत किशोर आणि प्रतीक यांनी केली होती. नंतर त्याचे नाव बदलून आय-पॅक (I-PAC) ठेवण्यात आले.
  • प्रशांत किशोर यांच्या जाण्यानंतर, प्रतीक  यांनी आय-पॅकची सूत्रे हाती घेतली.
  • प्रशांत यांनी बिहारमध्ये जन सूरज पार्टीची स्थापना केली. आय-पॅक 2021 पासून तृणमूल काँग्रेसशी (TMC) संलग्न आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Chopra Follows Abhijeet Dipke: 'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
Gitanjali Angmo : 'कधी चीनचा एजंट तर कधी संघी..., मोदी आणि राहुल गांधींना टॅग करत गीतांजली आंग्मो संतापल्या
'कधी चीनचा एजंट तर कधी संघी..., मोदी आणि राहुल गांधींना टॅग करत गीतांजली आंग्मो संतापल्या
E20 Petrol : पेपरफुटी आंदोलनाच्या यशानांतर आता E 20 पेट्रोलचा मुद्दा; अरविंद केजरीवाल आंदोलन छेडण्याच्या तयारीत
पेपरफुटी आंदोलनाच्या यशानांतर आता E 20 पेट्रोलचा मुद्दा; अरविंद केजरीवाल आंदोलन छेडण्याच्या तयारीत

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget