एक्स्प्लोर

Marathi Webseries:'आणि काय हवं' नंतर प्रिया उमेशची नवीन सिरीज पाहिलीत? 8 एपिसोडमधून उलगडणार लग्नानंतरचा फोमो अन्.., कुठे पाहाल?

आठ भागांची ही मालिका प्रामाणिक आणि उत्कृष्ट अभिनयाने सजलीय. मराठी वेबविश्वात सध्या हे काय नवीन?ही मालिका चांगलीच चर्चेत आलीय. 

He Kay Navin Marathi Web Series: 'आणि काय हवं' या  धमाल आणि रोजच्या आयुष्यातील फ्रेश पात्रांसह आलेल्या वेब सिरीजनंतर अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) आणि अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) या दोघांची जोडी आणखी एका अशाच वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. दिग्दर्शक वरूण नार्वेकरची हे काय नवीन? ही मालिका एका लग्नातील गुंतागुंतीच्या भावना हलक्या-फुलक्या पण वास्तववादी पद्धतीने दाखवते. आठ भागांची ही मालिका प्रामाणिक आणि उत्कृष्ट अभिनयाने सजलीय. मराठी वेबविश्वात सध्या हे काय नवीन?ही मालिका चांगलीच चर्चेत आलीय. 

काय आहे मालिकेची कथा?

या मालिकेची कथा रमा (Priya Bapat) आणि तिचा नवरा आदित्य (Umesh Kamat) यांच्या आयुष्याभोवती फिरते. वरकरणी सर्व काही सुरळीत असलं, स्थिर नोकरी, प्रेमळ नातं आणि मुलं नको असा घेतलेला निर्णय, तरीही रमाच्या आयुष्यात ‘तुलना’ आणि ‘FOMO’ची भावना डोकं वर काढताना दिसते. निखिल आणि त्याची लिव्ह-इन पार्टनर साक्षी यांचं ‘परफेक्ट’ वाटणारं आयुष्य पाहून रमाला स्वतःच्या आयुष्याबद्दल प्रश्न पडू लागतात. याच दरम्यान, रमा नोकरी सोडून स्वतःचा कपड्यांचा ब्रँड सुरू करण्याचा निर्णय घेते. मात्र या नव्या प्रवासात तिच्या मनात आत्मविश्वासाऐवजी शंका अधिक वाढताना दिसतात.

वास्तववादी मांडणी प्रेक्षकांना गुंतवून ठेवणार

घरगुती पातळीवरही रमाला आधार मिळताना दिसत नाही. आई (Shubhangi Gokhale) तिच्यावर दबाव आणते, तर वडील (Uday Tikekar) तिच्या बाजूने असले तरी परिस्थिती सावरण्यात कमी पडतात. अशा वेळी आदित्यची साथ महत्त्वाची ठरते, पण हीच साथ कधी कधी अवलंबित्वाचं रूप घेत असल्याचंही जाणवतं. मालिकेच्या सुरुवातीला रमाच्या मानसिक ताण आणि ‘FOMO’चा प्रभाव प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे. उत्कृष्ट अभिनय आणि वास्तववादी मांडणीमुळे हे काय नवीन? ही मालिका प्रेक्षकांना गुंतवून ठेवणार हे नक्की. 

मालिकेत आईच्या तोंडी येणारे “या वयात आयुष्य स्थिर करायचं की आधीच स्थिर झालेलं सगळं पुन्हा ढवळून काढायचं?” आणि “अजून किती ‘न्यूक्लिअर’ राहणार आहात?” हे संवाद पालकांच्या मनातल्या चिंता खऱ्या आयुष्याशी जोडणारे आहेत. आजच्या पिढीतील अनेक जोडप्यांना हे प्रश्न अगदी जवळचे वाटतात. याच पार्श्वभूमीवर रमाच्या आयुष्यात सुरू असलेला अंतर्गत संघर्षही मालिकेत दाखवला आहे. मात्र हा संघर्ष खरोखर तिच्या मनातील द्वंद्व आहे की तिची भूमिका आधीच निश्चित आहे, याचं सादरीकरण थोडंसं संभ्रम निर्माण करतं. पुढे रमा तिचा व्यवसाय सुरू करते का, आईच्या विचारांत काही बदल होतो का, आणि रमा-आदित्यचं नातं कोणत्या नव्या टप्प्यांतून पुढे जातंया सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेत पुढे उलगडत जातात.

कुठे पाहाल?

ही मालिका ZEE5 वर प्रेक्षकांच्या भेटीला आलीय. 27 मार्च रोजी तिचं स्ट्रीमिंग सुरू झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक या सीरिजची आतुरतेने वाट पाहत होते आणि आता त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. ‘आणि काय हवं’ या गाजलेल्या मालिकेनंतर ‘हे काय नवीन?’मधून नेमकं काय वेगळं पाहायला मिळेल, तसेच प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या भूमिका कशा असतील, याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget