एक्स्प्लोर

Bappi Lahiri : 'डिस्को' सिंगर हरपला! शेकडो गाण्यांना दिला संगीताचा साज; अनेक गाणी गायली, बप्पीदांची सदाबहार गाणी

Bappi Lahiri Passed Away : बप्पीदा यांनी शेकडो चित्रपटांना संगीत दिलं. तसेच अनेक गाणीही स्वत: गायली. त्यातली कित्येक गाणी आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहेत. 

Bappi Lahiri Passed Away : जवळपास पाच दशके आपल्या संगीत आणि आवाजाने बॉलिवूडवर छाप सोडणारे ज्येष्ठ संगीतकार व गायक बप्पी लाहिरी (वय 70) यांचे काल रात्री निधन झाले. मागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आलोकेश लाहिरी असे बप्पी यांचे मूळ नाव होते. बॉलिवूडमध्ये 'बप्पीदा' अशी ओळख असलेले बप्पी लाहिरी यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. जुहू येथील क्रिटी बाप्पी लाहिरी केअर हॉस्पिटमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952  रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला होता. 

बप्पीदा यांनी शेकडो चित्रपटांना संगीत दिलं. तसेच अनेक गाणीही स्वत: गायली. त्यातली कित्येक गाणी आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहेत. 

बप्पी लाहिरी यांनी गायलेली दहा सदाबहार गाणी

'बंबई से आया मेरा दोस्त...', 
'देखा है मैंने तुझे फिर से पलट के तू मुझे जान से भी प्यारा है...', 
'याद आ रहा है तेरा प्यार...',
'सुपर डांसर आये हैं आये हैं...' 
'जीना भी क्या है जीना...'
'यार बिना चैन कहां रे...'
'तम्मा तम्मा लोगे...'
'प्यार कभी कम मत करना...','दिल में हो तुम...'
 'बंबई नगरिया...',
'उलाला उलाला...' 

संगीताचा साज असलेली अनेक गाणीही सुपरहिट 
अनेक गाणी बप्पीदा यांनी गायली. त्यांच्या संगीताचा साज असलेली अनेक गाणीही सुपरहिट ठरली आहेत. यात  'आओ तुम्हे चांद पे ले जाएं', 'जलता है जिया मेरा भीगी भीगी रातो में...', 'पग घुंघरू बांध मीरा नाची थी' 'जिमी जिमी जिमी आजा आजा...' 'आइ.एम.ए डिस्को डांसर...', ही गाणी विशेष ठरली.  1984 मध्ये‘शराबी’सिनेमातील संगीतासाठी त्यांना पहिल्यांदा सर्वश्रेष्ठ संगीतकारासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

1973 मध्ये 'नन्हा शिकारी' या चित्रपटातून संगीतकार म्हणून पदापर्ण केलेल्या बप्पी लाहिरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या हटक्या संगीताने छाप सोडली. ऐंशी-नव्वदीच्या दशकात त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना तरुणाईला वेड लावले होते. त्यांच्या संगीतातील ही जादू कायम होती. 'डर्टी पिक्चर' या चित्रपटात त्यांनी संगीतबद्ध आणि पार्श्वगायन केलेल्या 'उ लाला' हे गाणंही चांगलंच लोकप्रिय ठरलं. बप्पी लाहिरी यांनी डिस्को डान्सर, हिम्मतवाला, शराबी, अॅडव्हेंचर्स ऑफ टारझन, डान्स डान्स, सत्यमेव जयते शोला और शबनम यासारख्या चित्रपटांसाठी गाणी संगीतबद्ध केली. बप्पी यांनी 2014 साली भाजपकडून पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajabhau Waje : नाशिकमधील ठाकरेंचे खासदार अचानक भाजप आमदार अन् पदाधिकाऱ्यांच्या भेटीला; नेमकं कारण काय?
नाशिकमधील ठाकरेंचे खासदार अचानक भाजप आमदार अन् पदाधिकाऱ्यांच्या भेटीला; नेमकं कारण काय?
Mumbai houing lottery: पालिकेच्या कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी, 12 लाखात मुंबईत मिळणार घर
पालिकेच्या कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी, 12 लाखात मुंबईत मिळणार घर
Bhandara Accident News : एसटी बसनं महिलेला चिरडले; पती अन् दोन मुलांच्या डोळ्या देखत दुर्दैवी अंत, भंडारा शहर हादरलं! 
एसटी बसनं महिलेला चिरडले; पती अन् दोन मुलांच्या डोळ्या देखत दुर्दैवी अंत, भंडारा शहर हादरलं! 
Vidhan Parishad Election 2025: भाजपच्या विधानपरिषदेच्या 3 उमेदवारांची नावं ठरली; संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर आमदार होणार
भाजपच्या विधानपरिषदेच्या 3 उमेदवारांची नावं ठरली; संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर आमदार होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJP Vidhan Parishad Candidate List : भाजपच्या विधान परिषदेच्या उमेदवारांची नावं जाहीर, संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचेंना संधीSanjay Raut PC | देशात तणाव पसरवणं भाजपचं काम, मोहन भागवत हे सहन कसं करताय, राऊतांची रोखठोक भूमिकाABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 09 AM 16 March 2025ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 09 AM 16 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajabhau Waje : नाशिकमधील ठाकरेंचे खासदार अचानक भाजप आमदार अन् पदाधिकाऱ्यांच्या भेटीला; नेमकं कारण काय?
नाशिकमधील ठाकरेंचे खासदार अचानक भाजप आमदार अन् पदाधिकाऱ्यांच्या भेटीला; नेमकं कारण काय?
Mumbai houing lottery: पालिकेच्या कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी, 12 लाखात मुंबईत मिळणार घर
पालिकेच्या कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी, 12 लाखात मुंबईत मिळणार घर
Bhandara Accident News : एसटी बसनं महिलेला चिरडले; पती अन् दोन मुलांच्या डोळ्या देखत दुर्दैवी अंत, भंडारा शहर हादरलं! 
एसटी बसनं महिलेला चिरडले; पती अन् दोन मुलांच्या डोळ्या देखत दुर्दैवी अंत, भंडारा शहर हादरलं! 
Vidhan Parishad Election 2025: भाजपच्या विधानपरिषदेच्या 3 उमेदवारांची नावं ठरली; संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर आमदार होणार
भाजपच्या विधानपरिषदेच्या 3 उमेदवारांची नावं ठरली; संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर आमदार होणार
मुंबईत मंगलप्रभात लोढांसारखे अनेक बिल्डर मटण खाणाऱ्या हिंदूना गृहसंकुलात पाय ठेवू देत नाहीत, त्यावर हे 'मटणवाले' बोलणार का? संजय राऊतांचा 'रोखठोक' प्रहार
मुंबईत मंगलप्रभात लोढांसारखे अनेक बिल्डर मटण खाणाऱ्या हिंदूना गृहसंकुलात पाय ठेवू देत नाहीत, त्यावर हे 'मटणवाले' बोलणार का? संजय राऊतांचा 'रोखठोक' प्रहार
बीडच्या शिक्षकानं चिमुरड्या लेकीला एकटी सोडून आयुष्य संपवलं, पोलीस म्हणतात 'आम्ही कारवाई करु शकत नाही'
बीडच्या शिक्षकानं चिमुरड्या लेकीला एकटी सोडून आयुष्य संपवलं, पोलीस म्हणतात 'आम्ही कारवाई करु शकत नाही'
Nagpur News: गुडीपाडव्याला नरेंद्र मोदी हेडगेवारांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेणार? नागपूरच्या संघस्थानी जाणारे ठरणार पहिले पंतप्रधान
गुडीपाडव्याला नरेंद्र मोदी हेडगेवारांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेणार? नागपूरच्या संघस्थानी जाणारे ठरणार पहिले पंतप्रधान
दिल्लीत इंडिया इस्लामिक कल्चर सेंटरमध्ये इफ्तार पार्टीला सीएम रेखा गुप्ता, प्रवेश वर्मा, भाजप प्रदेशाध्यक्षांसह दिग्गज पोहोचले
दिल्लीत इंडिया इस्लामिक कल्चर सेंटरमध्ये इफ्तार पार्टीला सीएम रेखा गुप्ता, प्रवेश वर्मा, भाजप प्रदेशाध्यक्षांसह दिग्गज पोहोचले
Embed widget