एक्स्प्लोर

BLOG : भूषण गगराणी, बस नाम ही काफी है…

भूषण गगराणी
बस नाम ही काफी है…

सर, आज आपण सेवा निवृत्त होत आहात. त्या निमित्तानं.. 

1991-92 चं वर्ष असावं. कोल्हापूरच्या कोंडा वळीतल्या (कोंढा ओळ) घरात आपली पहिली भेट! आयएएस अधिकारी कसा असतो हे जवळनं पाहण्याचा तो माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग! 

त्या अगोदर शिवाजी विद्यापीठाच्या लायब्ररीत टाईट जीन्स आणि गांधीकाडीचा बॅाटलग्रीन रेबॅान घालून मार्गदर्शन करायला येणारी पीएसआय लोकच भेटली होती. एकादा तुरळक तहशीलदार वगैरे… 

मी यूपीएससीचा अभ्यास करणार हे मी कट्ट्यावर माझ्या मित्रांना सांगितलं. आजही कोल्हापुरातले सर्व महत्त्वाचे निर्णय हे कट्ट्यावरच होतात. माझ्या या निर्णयाला कडाडून विरोध करत कार्पोरेशनच्या येऊ घातलेल्या निवडणुकीची तयारी करण्याचा काळजीवजा प्रामाणिक सल्ला मला देण्यात आला.

परीक्षेच्या नादाला का लागायचं नाही हे पटवून देण्यासाठी पोरं मला संतोषकडं (नरेंद्र कुलकर्णी, आयआरएस, कस्टम्स) घेऊन गेली. त्याचा अभ्यास आम्ही बाबूजमालात अगदी कौतुकानं पण जरा लांबनंच पाहिला होता. बाबूजमालात एकच चर्चा असायची, संत्या अभ्यासानं खुळं होणार म्हणून. त्या खोलीतली ती पुस्तकं, तो पसारा आणि ते वातावरण बघून जरा दचकलोच. अर्धातास गप्पा झाल्यावर संतोषनं सांगितलं, भूषण कोल्हापुरात आला आहे, तू एकदा भूषणला भेट म्हणून. संतोषनं वेळ आणि भेट ठरवून आपला पत्ता दिला होता.

आमच्या डोक्यातला आयएएस म्हणजे सूट बूटातला माणूस. दारातनंच ‘साहेब आहेत का’ म्हणून ओरडलो. मरून रंगाचा टी शर्ट आणि पायजम्यात आपण दत्त! 
‘हेमंत का तू? ये आत ये.’

मनात म्हटलं, ‘आपल्यासारखंच दिस्तंय की राव..’

जरा भीती कमी झाली. जरा निवांतच झालो म्हणा की! हिरोसारखा गोरापान चेहरा आणि कीडमीडीत म्हणावी अशी शरीरयष्टी. कसलाही तामझाम नाही, आविर्भाव नाही आणि ते मंद हास्य जे आजही तसंच टिकून आहे. 

मला जरा वेगळीच भीती होती. सायबानं इंग्रजीत बोलायला चालू केलं तर कसं करायचं? तसं पुढारीत वाचलं होतं की तुम्ही परीक्षा मराठीतनं दिली होती म्हणून. पण मराठी साहित्य हा विषय घेऊन की संपूर्ण परीक्षा मराठीतनं हा गोंधळ तेवढा स्पष्ट नव्हता. बरं, त्यांच्याकडं पाहिलं तर ह्या एवढ्या गोऱ्यापान, देखण्या आणि सुसंस्कृत माणसाला मराठी येत असेल असं वाटूच शकत नव्हतं. 

मला एक सफरचंद कापून देत आपण बोलला,

“सांग, काय करायचं ठरवलं आहेस?” 

आणि एक तासाभरात सर्व शंकांचं सुलभ मराठीत निरसन झालं. 

सर, यूपीएससीची परीक्षा मराठी भाषेत देण्याच्या आपल्या निर्णयानं अखंड महाराष्ट्रात वणवा पेटला. माझ्यासारख्या बांधावरच्या असंख्य पोरांच्या स्वप्नांना तुम्ही जी ताकद दिलीत तीचं मोल होऊच शकत नाही. क्रांतीची व्याख्या आणि उदाहरणं फक्त पुस्तकात वाचली होती... पण क्रांती होताना याची देही आम्ही अनुभवलेय ती ही माझ्यासारख्या अनेकांच्या आयुष्यात. 

इंग्रजी भाषेच्या न्यूनगंडात फसलेल्या तत्कालीन महाराष्ट्रातील लाखो तरूणांचे कार्ल मार्क्स आपण! 

कोल्हापूरकरांसाठी आपण प्रशासकीय सेवेत काय ठसा ऊमटवला हा प्रश्नच नाहीय. मराठीतून जग जिंकता येतं हे आपण कोल्हापुरातून उभ्या देशाला सांगितलं हे आमच्या लेखी महत्वाचं आहे. ‘अमृता तेही पैजा जिंके’ हे भक्तीभावानं ऐकत आणि म्हणत आलो होतो. तुम्ही ती पैज माऊलीच्या मराठीत जिंकली आणि कोणत्या वाटेनं जिंकता येतं हे आमच्यासारख्यांना दाखवून नवी वाट तयार केलीत. 

कोल्हापूरसाठी, महाराष्ट्रासाठी आणि आमच्या सारख्या बांधावरच्या अगणित पोरांसाठी तुम्ही कधी रिटायर होऊच शकत नाही. 

कधी जुन्या वळणावर,
नव्या वाटा शोधताना...
मी पुन्हा भेटेन,
त्याच बेधुंद वाऱ्यासोबत!

जिक्कलंस भावा…

आपला, 
हेमंत निंबाळकर (IPS)

(लेखक हे कोल्हापूरचे सुपुत्र असून ते सध्या कर्नाटक राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी कार्यरत आहेत)

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget