एक्स्प्लोर

Avatar 2 Trailer: पेंडोराच्या निळ्या विश्वाचं मनमोहक चित्रण! ‘अवतार 2’चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

Avatar 2 Trailer: ‘अवतार 2’चा 1 मिनिट 38 सेकंदांचा ट्रेलर दर्शकांना पेंडोराच्या अद्भुत जगाची झलक दाखवतो.

Avatar 2 Trailer: 'अवतार: द वे ऑफ वॉटर'चा पहिला ट्रेलर रिलीज झाला आहे. जेम्स कॅमेरून दिग्दर्शित हा चित्रपट यावर्षी 16 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'अवतार 2' चे (Avatar 2) व्हिज्युअल्स अतिशय प्रेक्षणीय आहेत. चित्रपटाच्या या ट्रेलरने प्रेक्षकांना पेंडोराच्या सुंदर निळ्या जगाची झलक दाखवली आहे. चित्रपटाचा ट्रेलर इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर ऑनलाइन प्रदर्शित करण्यात आला आहे.

तब्बल 13 वर्षांनी या चित्रपटाची नवी अपडेट समोर आली आहे. ‘अवतार’ चित्रपटाच्या सिक्वेलचे अधिकृत शीर्षक जाहीर झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट बघत होते. प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरलेला हा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. जेम्स कॅमेरुनच्या ‘अवतार’च्या सिक्वेलला ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ असे नाव देण्यात आले आहे.

‘अवतार 2’चा 1 मिनिट 38 सेकंदांचा ट्रेलर दर्शकांना पेंडोराच्या अद्भुत जगाची झलक दाखवतो. ट्रेलरमध्ये असे अनेक सीन्स आहेत, ज्यामध्ये समुद्र आणि त्यात राहणारे प्राणी खास भूमिकेत दिसत आहेत. ट्रेलरमध्ये सॅम वर्थिंग्टन आणि जो सल्डाना आपापल्या भूमिकेत दिसत आहेत. यावेळी ते त्यांच्या कुटुंबासह दिसत आहे.

पाहा ट्रेलर :

व्हिज्युअल इफेक्ट्सच्या जोरावर ‘अवतार’ (Avatar 2) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. निळ्या रंगाच्या प्राण्यांच्या विश्वावर आधारित या कथेने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली होती. या दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची घोषणा आधीच केली होती. त्यामुळेच जवळपास दशकभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या सिक्वेलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता या चित्रपटाचं नाव आणि ट्रेलर देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘अवतार’ हा चित्रपट 2009मध्ये प्रदर्शित झाला होता. तब्बल 13 वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर आता ‘अवतार’च्या सिक्वेलमधून नवा अध्याय सुरू होणार आहे. ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’मध्ये आता जेक आणि जो सल्डाना नेटिएरी यांच्या जीवनात पुढे काय घडणार हे दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट 16 डिसेंबर 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
Prajakta Mali Short Hair: प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
Salman Khans Body Double: सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
Veteran Actress Death: ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget