Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
राहुल गांधी यांच्या पुण्यातील 'छात्रों की गूंज' या कार्यक्रमाच्या आधी पुण्यात मोठा राडा झाल्याचं दिसून आलं. सीओईपी कॉलेजमध्ये काँग्रेस आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने या परिसरात गोंधळ झाल्याची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांकडून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. काँग्रेसच्या देशव्यापी 'छात्रों की गूंज' अभियानाचा चौथा टप्पा पुण्यात संध्याकाळी ६ वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमात ते प्रामुख्याने विद्यार्थिनी आणि तरुणींशी थेट संवाद साधणार असून शिक्षण, वाढती बेरोजगारी आणि महिलांच्या सुरक्षेच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करणार आहेत.
जेन-झीला साद घालण्यासाठी पुण्यात राहुल गांधी तरुणींशी संवाद साधणार आहेत.. आज होणाऱ्या राहुल गांधींच्या या कार्यक्रमावरुन जोरदार राजकारण पेटलंय...
'युवकांना २५-२५ हजारांचं आमिष' देऊन गर्दी जमवण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपनं केलाय..छात्रो की गूंज या कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी जवळपास ३० अटींसह परवानगी दिलीय...त्यामुळे एवढ्या अटीशर्थी कशासाठी असा सवालही विरोधक विचारत आहेत... या कार्यक्रमाला सुमारे 8 ते 10 हजार मुली उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पुणे हे मुलींच्या पहिल्या शाळेचे शहर आहे. त्यामुळे या ऐतिहासिक शहरात राहुल गांधी मुलींशी थेट संवाद साधणार आहेत. पेपर लीक, विद्यार्थ्यांच्या हक्कांची लढाई, मुली आणि महिलांवरील वाढते अत्याचार, अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर राहुल गांधी मुलींशी संवाद साधणार आहेत...





















