Prajakta Mali Short Hair: प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
Prajakta Mali New Hair cut look: 'DINKS' या सिनेमातून प्राजक्ता माळीचा नवा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Prajakta Mali in Her New Short-Hair Look: मराठी कलाकार प्राजक्ता माळीचा (Prajakta Mali) चाहतावर्ग खूप मोठा आहे. अभिनेत्री सोशल मीडियात प्रचंड चर्चेत असते. प्राजक्ता प्रोफेशनलसह वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. आपल्या पोस्ट शेअर करुन दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी शेअर करत असते. तिनं अलिकडेच मुंबईतील प्राइम लोकेशनवर घर घेतलं. मुंबईतील एका इमारतीवर तिनं 28 मजल्यावर आलिशान फ्लॅट बुक केला असल्याची माहिती आहे. त्या फ्लॅटची किंमत कोट्यवधींच्या घरात (Mumbai flat) असल्याची माहिती आहे. अभिनेत्रीची सध्या नवीन घर घेतल्यामुळे विशेष चर्चा होत आहे. अभिनेत्री आता लवकरच ललित प्रभाकरसोबत (Lalit Prabhakar) स्क्रिन शेअर करणार आहे. ही जोडी 'शुभ मंगलम जोडी दंगलम' या सिनेमात झळकणार आहे.
अभिनेत्रीच्या नवीन लूकची विशेष चर्चा (Prajakta Mali in Her New Short-Hair Look For Upcoming Film)
दरम्यान, प्राजक्ता माळीची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली. अलिकडेच अभिनेत्रीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटोस शेअर केल्या आहेत. या पोस्टमधून तिने आपल्या नवीन प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना माहिती दिली. या पोस्टमधून, असे दिसून येते की, शूटिंगला सुरुवात झाली असून, तिच्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या आगामी सिनेमाचं नाव 'Dinks' असे असून, Double Income No Kids असा त्याचा फूलफॉर्म आहे. तिने पोस्टच्या सुरुवातीला या सिनेमाच्या शीर्षकाबाबत खुलासा केला.
View this post on Instagram
दुसऱ्या फोटोमध्ये प्राजक्ता माळीचा कधी न पाहिलेला लूक दिसत आहे. तिने आपले केस शॉर्ट केले आहेत. प्राजक्ताने ब्राऊन टॉपवर काही सेल्फी क्लिक केले आहेत. तिने पोस्टमधून आपला लूक शेअर केला आहे. प्राजक्ताचा बदललेला लूक पाहून चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. तिने आपल्या पोस्टला लक्षवेधी कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहिलं की, 'अशा चित्रपटाचं शूटिंग करत आहे, जे माझ्या वयोगटातील लोकांना सहज रिलेट होईल. ही बाब माझ्यासाठी नक्कीच भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरत आहे. खरंतर माझ्या मनाला थकवून टाकणारा आहे. या सिनेमासाठी तुमच्या शुभेच्छा मिळेली, अशी अपेक्षा आहे'.
'P.S- या सिनेमासाठी मी खास हेअर कट केला आहे. आता मी शॉर्ट हेअर गर्ल आहे. तुम्हाला कसं वाटलं...अधिकची माहिती लवकरच देईन', असं तिनं आपल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. नेटकऱ्यांनी प्राजक्ताची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल केली आहे. नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये अभिनेत्रीच्या लूक्सचं विशेष कौतुक केलं आहे. 'या हेअरकटमध्ये तू खूपच सुंदर दिसत आहे', असं एकाने कमेंट सेक्शनमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, तिचा चाहतावर्ग प्राजक्ताच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. Dinks या सिनेमात प्राजक्तासोबत मेन लीडमध्ये कोण झळकणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















