Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर तिसऱ्यांदा प्रेग्नेंट? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण.

Kareena Kapoor Pregnant Viral video: बॉलिवूडची बेबो उर्फ करीना कपूरचा (Kareena Kapoor) चाहतावर्ग खूप मोठा आहे. अभिनेत्री सोशल मीडियातही सक्रीय असते. तिचे बरेच पोस्ट आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतात. सध्या बेबोचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत करीनाचा बेबी बंप दिसत आहे. ती अलिकडेच जिम बाहेर स्पॉट झाली. करीना कपूरला पाहून नेटकऱ्यांनी बेबी बंप (Pregnancy) दिसत असल्याचं दावा केला. या व्हायरल व्हिडीओमुळे तिला प्रचंड ट्रोल (Social Media) करण्यात येत आहे. करीना कपूरला लवकरच तिसरं मूल होणार असल्याची चर्चा रंगू लागली. पण नक्की खरं काय?
करीना कपूर तिसऱ्यांदा प्रेग्नेंट? (Kareena Kapoor Pregnant With Her Third Child Viral Video)
व्हायरल व्हिडीओमध्ये करीना कपूरचा बेबी बंप दिसत आहे. अभिनेत्री जिमबाहेर स्पॉट झाली होती. तिने ब्लॅक आऊटफिट कॅरी केला होता. यावेळी करीना कपूरच्या बॉडीगार्डने अभिनेत्रीला छत्रीने कव्हर करण्याचा प्रयत्न केला. आता याचा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी, करीनाला तिसरं मूल होणार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. 'असं वाटतं, अभिनेत्रीला लवकरच तिसरं मूल होणार...' असंही एकाने कमेंटमध्ये म्हटलं आहे. अनेक नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
पण नक्की खरं काय? हे अद्याप समोर आलेलं नाही. किंवा अभिनेत्री करीना कपूरने यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. माहितीनुसार, करीना कपूरने 16 ऑक्टोबर 2012 साली अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केलं. 'टशन' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील मैत्री वाढली. दोघांमध्ये जवळीक वाढली. साधारण एकमेकांना 2 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या कपलला दोन मुलं आहेत. एकाचं नाव तैमूर अली खान तर, दुसऱ्याचं नाव जहांगीर अली खान असे आहे. सैफ अली खानचं हे दुसरं लग्न आहे. त्याने यापूर्वी अभिनेत्री अमृता सिंहसोबत लग्नगाठ बांधली.
दोघांमधील मतभेद वाढल्यानंतर दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अमृता आणि सैफ अली खानला दोन मुलं आहेत. मुलगी सारा अली खान आणि मुलगा इब्राहिम खान. वर्कफ्रंटबाबत बोलायचं झाल्यास अभिनेत्री शेवटी 2024 साली रिलीज झालेल्या 'सिंघम अगेन'मध्ये दिसली होती. आता करीना कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















