Ashok Mama Marathi Serial Track: इतिहासात पहिल्यांदाच अशोक सराफ, निवेदिता सराफ टेलिव्हिजनच्या स्क्रिनवर एकत्र; अशोक मा.मा. मालिकेत नवा ट्वीस्ट
Ashok Mama Marathi Serial Track: मराठी प्रेक्षकांसाठी ही एक अविस्मरणीय पर्वणी ठरणार आहे, कारण पुन्हाएकदा त्यांच्या साजेश्या गोड आणि हृदयस्पर्शी नात्याची जादू रूपेरी पडद्यावरून थेट घराघरांत पोहोचणार आहे.

Ashok Mama Marathi Serial Track: कित्येक दशकांपासून सिनेसृष्टीचा पडदा गाजवलेली लोकप्रिय जोडी (Celebrity Couple) म्हणजे, अशोक सराफ (Ashok Saraf) आणि निवेदिता सराफ (Nivedita Saraf). प्रेक्षकांनी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या सुपरहिट जोडीचं जादूई नातं मोठ्या पडद्यावर अनुभवलं आहे. पडद्यावरील अप्रतिम टायमिंग, गोड केमिस्ट्री आणि भावनिक सादरीकरण हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी (Television News) नेहमीच खास ठरलं आहे. आता ही आवडती जोडी लवकरच पहिल्यांदा छोट्या पडद्यावर एकत्र येत आहे.
मराठी प्रेक्षकांसाठी ही एक अविस्मरणीय पर्वणी ठरणार आहे, कारण पुन्हाएकदा त्यांच्या साजेशा गोड आणि हृदयस्पर्शी नात्याची जादू रूपेरी पडद्यावरून थेट घराघरांत पोहोचणार आहे. त्यांच्या हसऱ्या केमिस्ट्रीपासून ते भावनिक प्रसंगांपर्यंत, या जोडीनं प्रत्येक वेळेस हृदयाला भिडणारे क्षण दिले आहेत. आता त्यांचं हे सुंदर नातं पुन्हा एकदा 'अशोक मा.मा.' या मालिकेमधून छोट्या पडद्यावर खुलणार आहे. नक्की काय घडणार मालिकेत ? अशोक मा.मा. आणि निवेदिता यांच्यामधील नातं कसं खुलणार? अशोक मा.मा. मालिकेतून संपूर्ण टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच अशोक सराफ आणि निवेदिता सराफ एकाच मालिकेत एकत्र येणार आहेत.
View this post on Instagram
या मालिकेत निवेदिता ताई निवेदिता हि भूमिका साकारणार आहेत. त्या उत्साही, आत्मनिर्भर आणि अविवाहित स्त्रीची भूमिका साकारत आहेत. त्या स्वतःचा 'संस्कार वर्ग' चालवतात. पण त्यांचा संस्कार वर्ग हा पारंपरिक चौकटीत बसलेला नाही. तो आहे दया,आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेने भरलेला. त्या मुलांना कथा, कला आणि हास्याच्या माध्यमातून जीवनमूल्यं शिकवतात. जेव्हा अशोक मा.मा. आपल्या नातवंडांना इरा आणि इशानला या वर्गात आणतात, तेव्हा त्यांना अपेक्षा असते एका शिस्तप्रिय, पारंपरिक शिक्षिकेची. पण समोर येते एक वेगळीच स्त्री आधुनिक विचारांची, पण मुळाशी असलेली. तिची मोकळी, हटके शिकवण्याची पद्धत मामांचे ठाम विचार हादरवून टाकते... आता हळूहळू दोघांमधील चकमकीतून यांचं नातं कोणतं वळण घेणार? मालिकेत कळेलच.
निवेदिता सराफ याबद्दल बोलताना म्हणाल्या की, "मला खूप दिवसांपासून प्रेक्षक विचारात होते, तुम्ही आणि अशोक सराफ एकत्र कधी काम करणार आहात. तर बऱ्याच दिवसांपासून माझी देखील इच्छा होती, त्यांच्यासोबत काम करायची. मला खरंच खूप आवडतं त्यांच्याबरोबर काम करायला, माझे सर्वात आनंदाचे दिवस असतात, जेव्हा मी त्यांच्यासोबत काम करते. खूपकाही शिकायला मिळतं. बऱ्याच वर्षांनी संधी मिळाली आहे मलाही, आता लवकरच अशोक मा.मा. या मालिकेत माझी एंट्री होणार आहे. यामधील खास गोष्ट म्हणजे, छोट्या पडद्यावर आमची जोडी पहिल्यांदाच दिसणार आहे. मी खूप उत्सुक आहे, खात्री आहे तुम्हाला देखील आवडेल..."























