एक्स्प्लोर

Jaat Movie Controversy Over Church Scene: एकीकडे बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई, दुसरीकडे सिनेमाच्या अडचणींत वाढ; ख्रिश्चन समुदायाकडून 'जाट'वर बंदीची मागणी

Jaat Movie Controversy Over Church Scene: 'जाट' चित्रपटातील चर्चमधील एका दृश्यावर ख्रिश्चन समुदायानं आक्षेप घेतला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात आणि त्यांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

Jaat Movie Controversy Over Church Scene: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सनी देओलचा (Sunny Deol) 'जाट' सिनेमा (Jaat Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुमाकूळ घालत आहे. सनी देओल, रणदीप हुड्डा (Randeep Hooda) आणि विनीत कुमार सिंह (Vineet Kumar Singh) स्टारर 'जाट' (Jaat) हा चित्रपट रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. पण, आता 'जाट' चित्रपटाभोवती वादाचे काळे ढग जमा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपटातील एका दृश्यावरुन वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. 'जाट'मध्ये एक चर्चचं दृश्य दाखवण्यात आलं आहे. याच दृश्यावर ख्रिश्चन समुदायानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या सीनमुळे ख्रिश्नच समाजाच्या भावना दुखावल्या जात असल्याचंही बोललं जात आहे. 

'जाट' सिनेमात एक चर्चचा सीन दाखवण्यात आला आहे. या सीनमध्ये रणदीप हुड्डा चर्चच्या आत, क्रॉसच्या अगदी खाली, व्यासपीठाजवळ (Pulpit) उभा असल्याचं दाखवलं आहे, तिथेच बाजूला जिथे ख्रिश्चन बांधव प्रार्थना करत असल्याचं दाखवलं आहे. त्यासोबतच चित्रपटात गुंडगिरी आणि धमकीची दृश्यही दाखवण्यात आली आहेत. ज्यामुळे ख्रिश्चन समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे.   

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

ख्रिश्चन समुदायाचं नेमकं म्हणणं काय?

ख्रिश्चन समुदायाचं म्हणणं आहे की, हे दृश्य केवळ त्यांच्या श्रद्धेचा अपमान नाही तर चर्चमधील सर्वात पवित्र स्थानाचा - मंचाचाही अपमान आहे. जाणूनबुजून असं दृश्य दाखवून ख्रिश्चन धर्माची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा त्यांचा आरोप आहे. सुरुवातीला, समुदायानं थिएटरबाहेर निषेध करण्याची योजना आखली होती, पण पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर निषेध थांबवण्यात आला. आता समुदायानं सहआयुक्तांना एक निवेदन सादर करून चित्रपटावर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे. 

चित्रपटाचे दिग्दर्शन गोपीचंद मालिनेनी यांनी केले आहे आणि पीपल मीडिया फॅक्टरी, मैश्री मूव्ही मेकर्स आणि टीजी विश्व प्रसाद यांनी त्याची निर्मिती केली आहे. पण चित्रपटाबाबत जो राग दिसून येत आहे, तो आता निर्मात्यांसाठी अडचणीचा विषय बनत आहे. ख्रिश्चन समुदायाच्या नेत्यांनी याला 'जाणूनबुजून केलेला अपमान' म्हटलं आहे आणि धार्मिक भावना दुखावल्याबद्दल चित्रपटाच्या संपूर्ण टीमवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ख्रिश्चन समुदायानं सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटमही दिला आहे. जर निर्धारित वेळेत ठोस पावलं उचलली गेली नाहीत तर निषेध आणखी तीव्र केला जाईल, असंही समुदायाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Actor Physically Abused At 14: 'मी त्यांच्यासोबत एकाच बेडवर झोपू शकतो...'; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वक्तव्यानं सारेच अवाक्, कित्येक वर्षांनंतर धक्कादायक घटनेचा खुलासा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बॉलीवूड अभिनेत्रीचा आईला शेवटचा निरोप, आठवणींनी हळवी झाली, हृदयस्पर्शी पोस्ट चर्चेत
बॉलीवूड अभिनेत्रीचा आईला शेवटचा निरोप, आठवणींनी हळवी झाली, हृदयस्पर्शी पोस्ट चर्चेत
Monalisa Muslim Husband Farman Khan:
"आम्ही धर्म बदललेला नाही, हे 'लव जिहाद' नाही"; मुस्लिम प्रियकराशी लग्न केल्यानंतर 'महाकुंभ व्हायरल गर्ल' मोनालिसाची पहिली प्रतिक्रिया
प्रसिद्ध अभिनेत्याचा राहत्या घरात मृत्यू; मनोरंजन विश्व हळहळलं, बालकलाकार म्हणून केलेलं काम
प्रसिद्ध अभिनेत्याचा राहत्या घरात मृत्यू; मनोरंजन विश्व हळहळलं, बालकलाकार म्हणून केलेलं काम
Gaurav Khanna: ना 50 लाख, ना कार... 'बिग बॉस 19'चा विजेता गौरव खन्नाला काहीच मिळालं नाही, म्हणाला...
ना 50 लाख, ना कार... 'बिग बॉस 19'चा विजेता गौरव खन्नाला काहीच मिळालं नाही, म्हणाला...

व्हिडीओ

Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India LPG Crisis: इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
Ashneer Grover On LPG: 'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
OBC Reservation : फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
Iran War Live Update: सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
Shivsena : शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी तयार, पण कोर्टाकडून पुन्हा पुढची तारीख
शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी तयार, पण कोर्टाकडून पुन्हा पुढची तारीख
उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
Embed widget