Ankita Lokhande : अंकिता लोखंडे प्रेग्नंट? बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच म्हणाली...
Ankita Lokhande : अभिनेत्री अंकिता लोखंडे ही बिग बॉसच्या घरात असतानाच तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता पुन्हा एकदा अंकिताच्या प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
![Ankita Lokhande : अंकिता लोखंडे प्रेग्नंट? बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच म्हणाली... Ankita Lokhande Pregnancy rumours Ankita and Vicky Jain Bigg Boss contestant speaks about it detail marathi news Ankita Lokhande : अंकिता लोखंडे प्रेग्नंट? बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच म्हणाली...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/15/9b0502557a9afe77b568870d53d412ee1707981887943720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ankita Lokhande on Her Pregency : बिग बॉस 17 (Bigg Boss 17)च्या सीजनमध्ये अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) हे जोडपं सर्वात जास्त चर्चेत आलं होतं. त्यांची भाडणं, रुसवे, फुगवे, त्यांचा खेळ या सगळ्यामुळे अंकिता आणि विकीच्या नात्याविषयी बरीच चर्चा झाली होती. पण या सगळ्यामध्ये अंकिताच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना सगळ्यात जास्त उधाण आलं होतं. इतकच नाही तर बिग बॉसच्या घरात अंकिताची प्रेग्नंसी टेस्ट देखील करण्यात आली होती. पण ती टेस्ट निगेटिव्ह आली. पण पुन्हा एकदा अंकिताच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर स्वत: अंकिता आणि विकीने भाष्य केलं आहे.
हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये, अंकिता आणि विकी यांनी त्यांच्या मूल जन्माला घालण्याच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की, आम्ही स्वत: अजून लहान मुलं आहोत. तर या प्रश्नावर विकीने म्हटलं की, आम्ही देखील याबाबत विचार करत आहोत. मुलाखतीदरम्यान अंकिता तिच्या फॅमिली प्लॅनिंगविषयी विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी अंकिता आणि विकी दोघांनीही यावर मनमोकळेपणाने उत्तर दिलं.
आम्ही आजही परफेक्ट कपल आहोत - अंकिता लोखंडे
बिग बॉसच्या घरामध्ये अंकिता आणि विकीच्या नात्यावर बरेच प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यांच्यामध्ये होणारी भांडणं, त्यानंतर त्यांच्या कुटुंबाकडून घेतली जाणारी दखल, यामुळे त्यांच्या परफेक्ट कपल असल्याच्या टॅगवर अनेकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. त्यावर बोलताना अंकिताने म्हटलं की, ज्या जोडपं अगदी परफेक्ट असतं त्यांच्यात भांडणं होत नाही का? उलट जे जोडपं भांडतं देखील तेच परफेक्ट कपल असतं. पण बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर मी विकीसोबत अजिबात भांडले नाही. जे काही वाईट होतं, ते आम्ही तिथेच सोडून आलो आहोत.
बिग बॉसच्या घरात अंकिताची प्रेग्नंसी टेस्ट
बिग बॉसच्या घरामध्ये अंकिता लोखंडेची प्रेग्नंसी टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर अंकिता लगेचच 'बिग बॉस 17' हा कार्यक्रम सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली. पण प्रत्यक्षात मात्र असे काहीही झाले नाही. कारण अंकिता लोखंडेचा प्रेग्नंसी रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यामुळे अंकिता आई होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)