Ananya Panday : रिलेशनशिपवर अनन्या पांडेने सोडलं मौन, ईशान खट्टरबद्दल बोलताना म्हणाली...
Ananya Panday Affaire : अलीकडेच, अनन्याने ईशानचा भाऊ शाहिद कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीतील एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि तो फोटो होता अनन्या आणि ईशानचा.
Ananya Panday Affaire : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) सध्या तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत असते. सध्या अनन्या ईशान खट्टरला (Ishaan Khatter) डेट करत असल्याची चर्चा आहे. परंतु, दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अद्याप मौन बाळगले आहे. अलीकडेच, अनन्याने ईशानचा भाऊ शाहिद कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीतील एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि तो फोटो होता अनन्या आणि ईशानचा. आता अनन्याने ईशानसोबतच्या नात्यावर मौन सोडले आहे.
अनन्याने बॉलिवूड बबल्सला दिलेल्या मुलाखतीत ईशान आपल्यासाठी खूप खास असल्याचे म्हटले आहे. यावेळी अनन्या काही चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. एका चाहत्याने अनन्याला तिचे रिलेशनशिप स्टेटस विचारले. यावेळी, आधी तिने प्रश्न ऐकलाच नसल्याचा आव आणला. नंतर मात्र ती म्हणाला की, मी खूप आनंदी आहे.
कोण आहे आवडता सहकलाकार?
जेव्हा फॅन्सने अनन्याला तिच्या आवडत्या को-स्टारबद्दल विचारले, तेव्हा तिने लगेच ईशानचे नाव घेतले. त्यानंतर सिद्धांत चतुर्वेदीचे नाव घेतले, ज्याच्यासोबत ती ‘गेहरांईया’नंतर ‘खो गये हम कहाँ’मध्ये पुन्हा काम करणार आहे.
नुकताच शाहिद कपूरने त्याच्या वाढदिवसाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अनेक फोटो आहेत. त्यात ईशान आणि अनन्याचा एक फोटोही होता, जो व्हायरल झाला आहे. या फोटोत दोघेही एकमेकांचा हात धरून हसताना दिसले. यासोबतच शाहिद आणि अनन्याचा फोटोही होता. या पार्टीत अनन्या आणि ईशान एकत्र पोहोचले होते.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, नुकताच अनन्याचा ‘गेहरांईया’ हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि धैर्य करवा मुख्य भूमिकेत दिसले आहेत. तर, ईशान लवकरच कतरिना कैफ आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत ‘फोन बूथ’मध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :
- Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी' ओटीटीवर पाहण्यासाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागू शकते, 'हे' आहे कारण
- Pawankhind : दुसऱ्या आठवड्यातही 'पावनखिंड'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! पाहा कलाकार काय म्हणतात...
- Ponniyin Selvan-1 : ऐश्वर्याच्या 'पोन्नियन सेलवन' ची रिलीज डेट जाहीर ; फर्स्ट लूक चर्चेत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha