Nita Ambani : ''लग्न घर आहे, माफ करा...'', वरमाई नीता अंबानी यांनी सगळ्यांसमोर हात का जोडले? पाहा व्हिडीओ
Nita Ambani Viral Video : आता लग्न आणि रिसेप्शन संपल्यानंतर नीता अंबानींचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओत नीता अंबानी यांनी कॅमेऱ्यासमोर सगळ्यांची माफी मागितली आहे.
![Nita Ambani : ''लग्न घर आहे, माफ करा...'', वरमाई नीता अंबानी यांनी सगळ्यांसमोर हात का जोडले? पाहा व्हिडीओ anant ambani radhika merchant wedding reception nita ambani humble towards media apologize if some mistake during wedding ceremony video goes viral Nita Ambani : ''लग्न घर आहे, माफ करा...'', वरमाई नीता अंबानी यांनी सगळ्यांसमोर हात का जोडले? पाहा व्हिडीओ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/15/999c6cfb1ce1816477778185e2a456451721018263690290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nita Ambani Viral Video : अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा शाही विवाह सोहळा (Anant Ambani Radhika Merchant Wedding) 12 जुलै रोजी पार पडला. नुकतेच 12 जुलै रोजी विवाह सोहळा पार पडल्यानंतर 13 जुलै रोजी शुभ आशीर्वाद कार्यक्रम आणि 14 जुलै रोजी ग्रँड रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्याआधी मार्च आणि मे महिन्यातही नेत्रदीपक प्री-वेडिंग फंक्शन्सचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व फंक्शन्समध्ये अंबानी कुटुंबाने देश-विदेशातील सेलिब्रिटी पाहुण्यांना आमंत्रित केले होते. आता लग्न आणि रिसेप्शन संपल्यानंतर नीता अंबानींचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओत नीता अंबानी यांनी कॅमेऱ्यासमोर सगळ्यांची माफी मागितली आहे.
वरमाई असलेल्या नीता अंबानी यांनी अनंत-राधिकाच्या लग्नात बरीच धावपळ केली असल्याचे दिसून आले. देशविदेशातील खास पाहु्ण्यांचे स्वागत करण्यासह मुलाच्या लग्नाच्या विधींवरही नीता अंबानी स्वत: लक्ष ठेवून होत्या. या सगळ्या व्यस्त कार्यक्रमात नीता अंबानी या पॅप्स आणि माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर कॅमेऱ्यासमोर माफी मागितली आहे.
नीता अंबानी यांनी काय म्हटले?
नीता अंबानी यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. नीता अंबानी यांनी म्हटले की, ''तुम्ही सगळे माझ्या अनंत आणि राधिकाच्या लग्नासाठी इतक्या दिवसांपासून आहात. त्यामुळे तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. हे लग्न घर आहे आणि तुम्ही सर्वजण या आमच्या आनंदाच्या उत्सवाचा एक भाग झालात. आम्हाला समजून घेतल्याबद्दल धन्यवाद आणि काही चूक झाली असेल तर हे लग्नघर आहे म्हणून माफ करा असे नीता अंबानी यांनी म्हटले. त्यांनी पुढे म्हटले की, आशा आहे की तुम्हा सर्वांना उद्याचे निमंत्रण मिळाले असेल, त्यामुळे तुम्ही उद्या पाहुणे म्हणून यावे. उद्या कुटुंबासह तुम्हा सर्वांचे स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असेही नीता अंबानी यांनी म्हटले.
View this post on Instagram
नीता अंबानी यांचे नेटकऱ्यांनी केले कौतुक...
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या नीता अंबानी यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका युजरने म्हटले की, शाही लग्न सोहळा पार पडत असला तरी इतकी लहान गोष्टही लक्षात ठेवण्यात आली. त्यांचे हे शब्द कोणाचेही मन जिंकेल. सहानुभूती आणि विनम्रता कशी असावे, हे यांच्याकडून शिकावे असे नेटकऱ्यांनी म्हटले. नीता अंबानींनी किती सुंदर शब्दांचा वापर केला आहे, असे एका युजरने म्हटले. सौंदर्यासह बुद्धीमत्ता आणि संवेदनशील हृदयही त्यांच्याकडे आहे असे एकाने म्हटले. हीच खरी श्रीमंती असल्याचे एका युजरने म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)