'3 वर्ष काम नाही, घराचा हप्ताही थकला..' स्वामी समर्थांना 'सॉरी' का म्हटलं?; अमृता खानविलकरने सांगितला 'तो' किस्सा
Amruta Khanvilkar Shares Swami Samarth Experience: कोव्हिड काळात अमृता खानविलकर आर्थिक अडचणीत सापडली होती. त्यावेळी स्वामी समर्थांच्या फोटोमुळे तिचे अनेक प्रश्न मार्गी लागले.

Amruta Khanvilkar Shares Swami Samarth Experience: मराठी इंडस्ट्री तसेच हिंदी सिनेसृष्टीतून आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारी अभिनेत्री अर्थात अमृता खानविलकरचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिनं अल्पावधीतच आपल्या अभिनयातून चाहत्यांच्या मनात भुरळ घातली. अमृताचा चंद्रमुखी हा चित्रपट प्रचंड गाजला. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतात. तिनं अलिकडेच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत अमृतानं आपल्या आयुष्यातील अवघड काळातील अनुभव सांगितला. तसेच स्वामी समर्थांच्या चमत्कारी घटनेबद्दल सांगितले. तिनं मुलाखतीत घराबाबत किस्सा सांगितला. तसेच स्वामी समर्थ यांचा आलेला अनुभव तिनं शेअर केला. हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला. अनेकांनी कमेंट आश्चर्य व्यक्त केला.
अमृतानं मुलाखतीत सांगितलं की, "आमचं लोखंडवाला येथे घर आहे. आम्ही ते घर घेतलं. नंतर कोरोनानं भारतात हाहाकार माजवला. लोखंडवाला एरियातील घर असल्यामुळे EMI पण जास्त होता. काही दिवसांनंतर EMI फेडताना परवडत नसल्याचं समजलं. मग आम्ही निर्णय घेतला की हे घर आम्ही भाड्याने देऊ. कारण कुणीही विकत घेत नव्हतं. आमच्या सेव्हिंग्सनेही तळ गाठला होता. पुढे आम्हाला पैसे द्यायले नव्हते. कारण कुठे काम मिळत नव्हतं. काम बंद होतं"
View this post on Instagram
"शेवटी घर पाहण्यासाठी एक पार्टी आली. त्यांनी घर पाहिलं. घरात आमच्या मंदिर होतं. घर बघून गेले. ते म्हणाले की, ठीक आहे, उद्या पेपर साइन करू, असं ते म्हणाले. आमच्याकडे तेव्हा या घराचा पुढचा हप्ता देण्यासाठीही पैसे शिल्लक नव्हते. आम्ही त्यांना जस्ट विचारलं. तुम्ही हे घर का निवडलं? घर निवडण्यामागचं कारण काय? तेव्हा त्या व्यक्तीनं, तुमच्या मंदिरात स्वामींचा फोटो आहे, ते बघून मी घर घेतलं. मी त्यांना खूप मानतो, असं तो व्यक्ती म्हणाला. मी त्यावेळी मी खूप रडले", असं अमृता म्हणाली.
"हा माझ्याबरोबर घडलेला किस्सा आहे. मी मंदिराजवळ जाऊन स्वामींना सॉरी म्हटलं. मला वाटलं की, त्यांचं माझ्याकडे लक्ष नाही. स्वामी हे तुम्ही घडवून आणलं. आय एम सॉरी. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. घर घेतल्यानंतर कोरोनाचा उद्रेक वाढला. काम नसल्यामुळे जवळचे सगळेच पैसे संपले. पुढचा घराचा हप्ता थकला असता. नंतर बँक आणि इतर अडचणी आल्या असत्या. त्याचा त्रास झाला असता. ज्यांनी हे घर घेतलं, ते कपल तिथे 3 वर्ष राहिलं. आम्हाला त्या घराचा फार त्रास झाला नाही", असं अमृतानं सांगितलं. अमृताला आलेला अनुभव अद्भुत आणि आश्चर्यकारक होता, असं नेटकरी म्हणत आहेत. सध्या अमृतानं दिलेली मुलाखत सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
























