Amruta Khanvilkar : टेलिव्हिजन ते ओटीटी, अमृता खानविलकरने 2024 वर्षात केल्या 'या' खास गोष्टी!
Amruta Khanvilkar : अभिनेत्री अमृता खानविलकरने 2024 या वर्षात बऱ्याच खास गोष्टी केल्या आहेत.
Amruta Khanvilkar : अवघ्या काही दिवसांतच नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे. सरत्या वर्षात अनेकांनी त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, कामात वेगवेगळे प्रयोग करण्याचे प्रयत्न केले. अशातच अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिने तिच्यासाठी 2024 हे वर्ष कसं होतं, याविषयी सांगितलं आहे. अमृताने 2024 वर्षात अनेक कमालीचे बॉलिवूड प्रोजेक्ट्स केले आणि त्याला प्रेक्षकांची तितकीच पसंती देखील मिळाली.
बॉलिवुड मध्ये अमृताने विविध विषयांवर काम केलं आणि त्या भूमिका खासही केल्या आहे. जरी तिची ही भूमिका अगदी सोप्पी वाटत असली तरीही तितक्याच आव्हानात्मक अशा या भूमिका होत्या. तसेच अमृताने 2024 या वर्षा खऱ्या अर्थाने ओटीटी आणि बॉलिवूड गाजवलं. तिच्या सहज अभिनयाने तिने प्रेक्षकांच्याही मनावर राज्य केलंय. लुटेरे, चाचा विधायक है हमारे 3, 36 डे असे बॉलिवूड प्रोजेक्ट्स अमृताने केले आहेत.
मराठी सिनेमातही अमृताची झलक
मराठी सिनेसृष्टीतील कायमच चर्चेत राहिलेली ही अभिनेत्री आहे. " वर्ल्ड ऑफ स्त्री" सारखा शास्त्रीय आणि अर्ध-शास्त्रीय संगीत आणि नृत्याची अनोखी मैफिल तिने या वर्षात प्रेक्षकांना दिली. तसेच तिने 2024 मराठी सिनेमातही वेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या आहेत. लाईक अँड सबस्क्राईब , धर्मरक्षक संभाजी महाराज या चित्रपटातून तिने कमालीच्या भूमिका साकारल्या. तिने या वर्षात टेलिव्हीजन विश्वात देखील आपली छाप पाडलीय.
नेहमी पेक्षा वेगळ पण तितकच कठीण काम करण्यासाठी ती ड्रामा ज्युनियर्स साठी जज च्या भूमिकेत बसली. कामाच्या दृष्टीने अमृताने अनेक गोष्टी खास प्रोजेक्ट्स तर केले पण तिने मुंबईत स्वतःच हक्काचं घर देखील घेतलं. आगामी वर्षात अमृता आता काय काय प्रोजेक्ट्स करणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.
अमृताचे गाजलेले सिनेमे :
अमृताने आजवर तिच्या अभिनयाने आणि नृत्याने चाहत्यांना घायाळ केलं आहे. अमृताचे अनेक सिनेमे गाजले आहे. 'कट्यार काळजा घुसली', 'शाळा', 'साडे माडे तीन', 'चोरीचा मामला' आणि 'चंद्रमुखी' या मराठी सिनेमांसह तिने 'राझी', सत्यमेव जयते आणि 'मलंग' सारख्या हिंदी सिनेमांतदेखील आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अमृताचा 'चंद्रमुखी' हा सिनेमा गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमातील अमृताच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले. या सिनेमात अमृता चंद्राच्या भूमिकेत होती.
View this post on Instagram