एक्स्प्लोर

Kim Kardashian : क्रिस्टल्स निघाले, धागे तुटले! किम कर्दाशियनने परिधान केलेल्या मर्लिन मुन्रोंच्या ड्रेसचं मोठं नुकसान

Kim Kardashian : यंदाच्या वर्षी मेट गाला 2022मध्ये मॉडेल-अभिनेत्री किम कर्दाशियनने हॉलिवूड स्टार मर्लिन मुन्रो यांचा 60 वर्ष जुना गाऊन परिधान करून लोकांचे लक्ष आकर्षित करून घेतले होते.

Kim Kardashian : नुकत्याच झालेल्या Met Gala 2022मध्ये अनेक कलाकारांनी आपल्या फॅशनचा जलवा दाखवला. मात्र, जेव्हा किम कर्दाशियन (Kim Kardashian) रेड कार्पेटवर पोहोचली, तेव्हा तिला पाहून सगळेच थक्क झाले. किमने दिवंगत अभिनेत्री मर्लिन मुन्रो (Marilyn Monroe) यांचा 60 वर्ष जुना सुंदर गाऊन परिधान केला होता. यंदाच्या वर्षी मेट गाला 2022मध्ये मॉडेल-अभिनेत्री किम कर्दाशियनने हॉलिवूड स्टार मर्लिन मुन्रोचा 60 वर्ष जुना गाऊन परिधान करून लोकांचे लक्ष आकर्षित करून घेतले होते. मात्र, किम कर्दाशियनने परिधान केलेला हा गाऊन आता खराब झाला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, किम कर्दाशियनने परिधान केल्यानंतर हा गाऊन खराब झाल्याचे बोलले जात आहे. या 60 वर्ष जुन्या आयकॉनिक गाऊनचे अनेक क्रिस्टल्स बाहेर आले आहेत आणि काही धाग्यांवर लटकलेले दिसत आहेत. तर, काही धागेही तुटल्याचे बोलले जात आहे.

तब्बल 6 दशकं जुना गाऊन!

मेट गाला 2022च्या रेड कार्पेटवर किम कर्दाशियनने परिधान केलेला हा गाऊन 6 दशक जुना असून, तो मर्लिन मुन्रोंच्या स्मरणार्थ आतापर्यंत जपून ठेवण्यात आला आहे. मर्लिन मुन्रो यांनी 60 वर्षांपूर्वी हा पोशाख परिधान केला होता. क्रिस्टलने सजवलेल्या या फ्लोअर लेन्थ गाऊनची किंमत करोडोंमध्ये आहे. त्यामुळे हा ड्रेस परिधान करून किम चांगलीच चर्चेत आली होती.

दरवर्षी किम कार्दशियन तिच्या मेट गाला लूकमुळे चर्चेत असते. मात्र, यावेळी ती तिच्या ड्रेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली होती. मर्लिन यांच्या या ड्रेसमध्ये फिट होण्यासाठी किमने अवघ्या 21 दिवसांत तिचे वजन 7 किलोने कमी केले होते. हा ड्रेस परिधान करून जेव्हा ती रेड कार्पेटवर पोहोचली, तेव्हा सगळे तिच्याकडे बघतच राहिले. किम तिचा बॉयफ्रेंड पीट डेव्हिडसनसोबत या बॉडीकॉन गाऊनमध्ये रेड कार्पेटवर पोहोचली होती. तिच्या या झगमगाटी गाऊनने या कार्यक्रमाची शोभा वाढवली होती.

किंमत ऐकलीत का?

शियर फॅब्रिकचा बनलेला, हा गाउन अनेक लहान लहान क्रिस्टल्सनी सजवलेला आहे. 6,000 हून अधिक क्रिस्टल्स यात जडवण्यात आले आहेत. किमने परिधान केलेला हा आयकॉनिक ड्रेस मर्लिन मुन्रो यांनी 1962मध्ये राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या बर्थडे गाण्यासाठी परिधान केला होता. या ड्रेसची किंमत तब्बल 38 कोटी इतकी आहे. 

हेही वाचा :

Met Gala 2022 : साडी अन् मेटल corset ; 'मेट गाला 2022' साठी नताशा पूनावालाचा खास लूक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Sarva Pitri Amavasya 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDeepak Sawant Meet Govinda :  माजी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंतांकडून गोविंदाची विचारपूसCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 1 ऑक्टोबर 2024 :  ABP MajhaMVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Sarva Pitri Amavasya 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
ऐश्वर्याला झालाय 'हा' आजार, सारखं वाढतंय वजन? सोशल मीडियावर दावा, नेटकरी म्हणाले,
दुर्धर आजारानं ग्रस्त ऐश्वर्या, सारखं वाढतंय वजन? नेटकरी म्हणाले, "अच्छा, म्हणूनच अभिषेकसोबत घटस्फोट..."
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, वेळोवेळी धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Embed widget