Happy Birthday Nawazuddin Siddiqui : कधीकाळी वॉचमनचे काम केले, दारोदारी मसाले विकले! आता बॉलिवूडवर राज्य करतोय नवाजुद्दीन सिद्दीकी!
Nawazuddin Siddiqui Birthday : जवळपास दोन दशकांच्या कारकिर्दीत, नवाजुद्दीनने आता इतकी ओळख मिळवली आहे की, चित्रपट किंवा वेब सिरीज प्रसिद्ध होण्यासाठी कवळ त्याचे नावच पुरेसे आहे.
Nawazuddin Siddiqui Birthday : ‘सेक्रेड गेम्स’मध्ये आमिर खानसोबत एक छोटी भूमिका साकारण्यापासून ते गायतोंडेपर्यंत, नवाजुद्दीन सिद्दीकीचा (Nawazuddin Siddiqui) प्रवास केवळ संघर्षांनीच भरलेला नाही, तर तो खूपच मनोरंजकही आहे. नवाजुद्दीनने हे सिद्ध केले आहे की, प्रत्येक भूमिकेत जीव ओतण्यासाठी तो शक्य ती सगळी मेहनत करतो आणि पात्रांमध्ये जिवंतपणा आणतो. जवळपास दोन दशकांच्या कारकिर्दीत, नवाजुद्दीनने आता इतकी ओळख मिळवली आहे की, चित्रपट किंवा वेब सिरीज प्रसिद्ध होण्यासाठी कवळ त्याचे नावच पुरेसे आहे. आज (19 मे) अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा वाढदिवस आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी हे मनोरंजन विश्वातील एक असे नाव आहे, जे प्रदीर्घ संघर्षामुळे आणि अभिनय क्षमतेमुळे चित्रपट जगतातील एक स्टार बनले आहे. मात्र, मनोरंजन विश्वात येण्यापूर्वी उदरनिर्वाहासाठी नवाजुद्दीनने अनेक कामे केली. कधी त्याने वॉचमन म्हणून काम केले, तर कधी दारोदारी जाऊन मसाला देखील विकला. एक भूमिका मिळवण्यासाठी त्याने अनेकदा ऑडिशन दिले, यावरून नवाजच्या संघर्षाचा अंदाज लावता येतो. जवळपास 12 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर नवाजला एक मोठा ब्रेक मिळाला आणि इथूनच त्याला खरी ओळख मिळाली.
अभिनय करायचा आधीच ठरवलेलं!
आपण अभिनेता व्हायचे, हे नवाजने आधीच ठरवले होते. त्यामुळेच त्याने दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला होता. अनेक अडचणींचा सामना करूनही, त्याने आपला अभ्यासक्रम अर्धवट सोडला नाही. नवाजुद्दीन जेव्हा मुंबईत आला, तेव्हा त्याचे स्वप्न मोठे स्टार बनण्याचे नव्हते. त्यापेक्षा त्याला फक्त टीव्ही मालिकांमध्ये काम करायचे होते.
सुरुवातीला ऑफर झाल्या ‘अशा’ भूमिका
अनेक वर्षांच्या संघर्षानंतर 1999मध्ये आमिर खानच्या ‘सरफरोश’ या चित्रपटातून नवाजुद्दीन सिद्दीकीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्या चित्रपटात दहशतवाद्याची भूमिका साकारल्यानंतर त्याला पुढे भिकारी, पाकिटमार, गुंडा-मवाली अशा पात्रांच्याच ऑफर्स मिळू लागल्या. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने काम केले, पण या भूमिका इतक्या छोट्या होत्या की, तो कुणाच्या नजरेसही पडला नाही. 2007मध्ये अनुराग कश्यपच्या 'ब्लॅक फ्रायडे' या चित्रपटात त्याला महत्त्वपूर्ण भूमिका मिळाली, ज्यातून तो लोकांच्या नजरेस पडला. या चित्रपटाने त्याचा इतर चित्रपटांमध्ये मोठ्या भूमिका मिळवण्याचा मार्ग मोकळा केला. यानंतर त्याला अनुराग कश्यपचा 'गँग्स ऑफ वासेपूर' चित्रपट मिळाला. या चित्रपटातील नवाजच्या अभिनयाने लोकांची मने जिंकली. 'गँग्स ऑफ वासेपूर 2' मधील नवाजने साकारलेल्या ‘फैजल’च्या भूमिकेनेही सर्वांची मनं जिंकली.
कधीकाळी ‘शूल’, ‘जंगल’, ‘द बायपास’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ यांसारख्या चित्रपटांमधून छोट्या-मोठ्या भूमिका साकारणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकीने ‘किक’, ‘बदलापूर’, ‘मांझी द माउंटन मॅन’, ‘द लंच बॉक्स’, ‘रमन राघव 2’, ‘रईस’, ‘मंटो’ आणि ‘ठाकरे’सारखे दमदार चित्रपट केले.
हेही वाचा :