Pushpa The Rise : Valentine's Dayला अल्लू अर्जुन झाला रोमँटिक, पत्नी स्नेहा रेड्डीच्या फोटो शेअरमध्ये लिहिली ही खास गोष्ट
Allu Arjun Sneha Reddy Valentine's Day : स्नेहा जहाँ फोटोमध्ये स्लीव्हलेस ड्रेसमध्ये आहे. त्याचबरोबर अल्लू अर्जुन वाढलेल्या दाढीसह रफ अँड टफ लूकमध्ये दिसत आहे.
![Pushpa The Rise : Valentine's Dayला अल्लू अर्जुन झाला रोमँटिक, पत्नी स्नेहा रेड्डीच्या फोटो शेअरमध्ये लिहिली ही खास गोष्ट Allu Arjun Valentine's Day allu arjun wife sneha reddy photo romance wedding valentines day Pushpa The Rise : Valentine's Dayला अल्लू अर्जुन झाला रोमँटिक, पत्नी स्नेहा रेड्डीच्या फोटो शेअरमध्ये लिहिली ही खास गोष्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/14/e211f37ef78db6c32445c838343d3731_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Allu Arjun Valentine's Day : अभिनेता अल्लू अर्जुनने (Allu Arjun) पत्नी स्नेहा रेड्डीला (Sneha Reddy) व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine's Day) शुभेच्छा दिल्या आहेत. अल्लू अर्जूुनने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो त्याच्या पत्नीबरोबर दिसत आहे. या फोटोमध्ये दोघेही फार सुंदर दिसत आहेत. अर्जुन आणि स्नेहा दोघेही पांढऱ्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. स्नेहा जहाँ स्लीव्हलेस ड्रेसमध्ये आहे. तर अल्लू अर्जुन वाढलेल्या दाढीसह रफ अँड टफ लूकमध्ये दिसत आहे. अल्लू अर्जुनने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याने लिहिले आहे, 'हॅपी व्हॅलेंटाईन डे क्यूटी'(Happy Valentine's Day Cutiee). अल्लू अर्जुन आणि स्नेहा यांची प्रेमकहाणीही एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखी आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुन आणि स्नेहा यांची पहिली भेट अल्लू अर्जुनच्या मित्राच्या लग्नात झाली होती. असे म्हटले जाते की, ते एकमेकांना पाहून प्रेमात पडले. अल्लू आणि स्नेहाची भेट त्यांच्या कॉमन फ्रेंड्सने घडवून आणली होती. त्यानंतर त्यांनी त्यांचे मोबाईल नंबर एक्सचेंज केले.
अल्लू अर्जुन आणि स्नेहा यांच्या लग्नाला 10 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांना अरहा (Arha) आणि अयान (Ayaan) नावाची दोन मुले देखील आहेत. तुम्हाला सांगतो की अल्लू अर्जुन अलीकडेच 'पुष्पा: द राइज' (Pushpa: The Rise) चित्रपटाच्या रिलीजनंतर चर्चेत आहे.
पुष्पा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्याचबरोबर 'पुष्पा : द रुल' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Valentines Day 2022 : तैमूरचं व्हॅलेंटाईन सेलिब्रेशन पाहिलंत का? करीना कपूरने शेअर केला खास फोटो...
- Tejasswi Prakash , Karan Kundrra : 'बिग बॉस'च्या घरात जुळलं सूत, तेजस्वीने सांगितला करणसोबतच्या पहिल्या 'व्हॅलेंटाईन डे'चा प्लॅन
- Rashmika Madanna : रश्मिकाच्या हसऱ्या चेहऱ्याचं ‘हे’ रहस्य माहितीये का? पाहा अभिनेत्री काय म्हणते...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)