Alia Bhatt Upset Over Home Videos Viral On Social Media: 'तुमच्या घरातले फोटो व्हायरल केले तर सहन कराल..?'; 250 कोटींच्या बंगल्याचे फोटो परवानगीशिवाय शेअर केल्यानं आलिया भट्ट संतापली
Alia Bhatt Upset Over Home Videos Viral On Social Media: आलिया भट्ट संतापली असून यासंदर्भात तिनं सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आलियानं राग व्यक्त केला आहे.

Alia Bhatt Upset Over Home Videos Viral On Social Media: बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री आलिया भट्ट (Bollywood Actress) यावेळी तिच्या कोणत्याही सिनेमामुळे नाहीतर वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आहे, तिच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे. आलियाची पोस्ट वाचून अगदी सहज लक्षात येतंय की, ती फारच संतापली आहे. पोस्टमध्ये आलियानं तिच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या प्रासव्हसीचा भंग केल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. आलियाच्या रागाचं कारण आहे, तिच्या नव्या 250 कोटींच्या बंगल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो.
आलिया भट्टच्या (Alia Bhatt) नव्या घराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्याचं बांधकाम सुरू आहे. यावर आलियानं इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, हे तिच्या गोपनीयतेचं उल्लंघन आहे, असं स्पष्ट म्हटलं आहे. पोस्टमध्ये आलियानं नेमकं काय म्हटलंय पाहूयात...

आलिया सोशल मीडिया पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाली?
आलिया भट्टनं सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिनं म्हटलंय की, "माझं म्हणणं तुम्हाला समजलं असेल की, मुंबईसारख्या शहरात जागा मर्यादित आहे. कधीकधी तुमच्या खिडकीतून तुम्हाला समोरच्या व्यक्तीचं घर दिसतं. पण याचा अर्थ असा नाही की, कोणालाही तुमच्या खाजगी घराचा व्हिडीओ बनवण्याचा आणि ते ऑनलाईन प्रसिद्ध करण्याचा अधिकार आहे. आमच्या घराचा, जे अजूनही बांधकाम सुरू आहे, त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तो आमच्या परवानगीशिवाय अनेक माध्यमांनी प्रसारित केला आहे."
"आमच्या प्रायव्हसीचा भंग करणारी ही कृती आहे. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने ही एक गंभीर समस्या आहे. परवानगीशिवाय कोणाच्याही खाजगी जागेचे व्हिडिओ किंवा फोटो काढणे हा content नाही, तर तो एक गुन्हा आहे. ही कृती सामान्य मानली जाऊ शकत नाही. कृपया विचार करा, तुमच्या घराच्या आतील भागाचे व्हिडिओ तुमच्या परवानगीशिवाय सार्वजनिकपणे शेअर केलेले तुम्हाला आवडतील का? आपल्यापैकी कोणालाही ते आवडणार नाही.", असं आलिया भट्टनं म्हटलं आहे.
पुढे बोलताना आलिया भट्ट म्हणाली की, "म्हणून ही एक नम्र पण ठाम विनंती आहे - जर तुम्हाला असे व्हिडिओ ऑनलाइन दिसले, तर कृपया ते पुढे पाठवू नका किंवा शेअर करू नका. आणि आमच्या मीडियामधील मित्रांना ज्यांनी हे व्हिडिओ आणि फोटो प्रसारित केले आहेत, मी तुम्हाला विनंती करतो की, ते तातडीने काढून टाका."
महत्त्वाच्या इतर बातम्या :























