एक्स्प्लोर

Anjali Tendulkar Buys Apartment in Virar: लेकाच्या साखरपुड्यानंतर अंजली तेंडुलकरांनी विरारमध्ये नवं घर खरेदी का केलं? समोर आली मोठी अपडेट

Anjali Tendulkar Buys Apartment in Virar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी विरारमधील पेनिन्सुला हाइट्स नावाच्या इमारतीत 391 चौरस फूटांचं अपार्टमेंट खरेदी केलं आहे.

Anjali Tendulkar Buys Apartment in Virar: काही दिवसांपूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Master Blaster Sachin Tendulkar) लेक अर्जुन तेंडुलकरचा (Arjun Tendulkar) गपचूप साखरपुडा झाला. अगदी छोटेखानी समारंभात सचिनच्या लेकानं आणि प्रसिद्ध उद्योगपतीच्या नातीनं एकमेकांना अंगठ्या घातल्या. सचिनच्या लेकानं उद्योगपती रवी घई यांच्या नातीशी म्हणजेच, सानिया चंडोकची (Saniya Chandok) आपली आयुष्यभराची जोडीदार म्हणून निवड केली आहे.  आधी फक्त साखरपुड्याच्या बातम्या समोर आलेल्या, आता स्वतः सचिन तेंडुलकरनं याची पुष्टी केली आहे. साखरपुडा झाला असला तरीसुद्धा आता आणखी एक माहिती समोर आल्यामुळे तेंडुलकर कुटुंबीयांची चर्चा रंगली आहे. सचिन तेंडुलकर यांची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी विरारमध्ये एक अपार्टमेंट खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी विरारमधील पेनिन्सुला हाइट्स नावाच्या इमारतीत 391 चौरस फूटांचं अपार्टमेंट खरेदी केलं आहे. अर्जुनचा साखरपुडा झाल्याच्या काही दिवसांतच अंजली तेंडुलकरांनी हे अपार्टमेंट खरेदी केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. 

अंजली तेंडुलकर यांनी विरारमध्ये का खरेदी केलं नवं घर?

Zapkey.com नं दिलेल्या माहितीनुसार, मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी विरारमध्ये 32 लाखांचं अपार्टमेंट खरेदी केलं आहे.

विरारमधील पेनिन्सुला हाइट्स नावाच्या इमारतीत हे अपार्टमेंट खरेदी केलं आहे. कागदपत्रांनुसार, हा व्यवहार 30 मे 2025 रोजी नोंदणीकृत झाला होता आणि त्यात 1.92 लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क समाविष्ट होतं. 391 चौरस फूट आकाराचं हे अपार्टमेंट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आहे.

महिला घर खरेदीदार म्हणून, अंजली तेंडुलकर यांनी मुद्रांक शुल्कावर 1 टक्का सवलतीचा लाभ घेतला. महाराष्ट्रात, महिला घरमालकांना या लाभाचा लाभ मिळतो, राज्यात शहर आणि जिल्ह्यानुसार मुद्रांक शुल्क दर 5 टक्के ते 7 टक्के दरम्यान आहे. 

अंजली तेंडुलकर यांनी खरेदी केलेल्या फ्लॅटमध्ये राहणार कोण?

अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाल्यानंतर काहीच दिवसांत अंजली तेंडुलकर यांनी अपार्टमेंट खरेदी केल्यामुळे जोरदार चर्चांना उधाण आलेलं. अंजली यांनी अर्जुन आणि त्याची होणारी पत्नी सानिकासाठी फ्लॅट खरेदी केल्याच्या चर्चाही सुरू होत्या. पण, आता या फ्लॅटमध्ये कोण राहणार? हे समोर आलं आहे. अंजली तेंडुलकर यांनी हा फ्लॅट त्यांच्या एका कर्मचाऱ्यासाठी खरेदी केला आहे.

सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तेंडुलकर डॉक्टर आहे. त्या नामांकीत बालरोगतज्ज्ञ आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना  बालरोगशास्त्रामध्ये सुवर्णपदकही मिळालं होतं. सध्या त्या स्वतंत्र प्रॅक्टिस करत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यासाठी अंजली तेंडुलकर यांनी विरारमधलं अपार्टमेंट खरेदी केलं आहे. विवारमधील नावाजलेल्या ठिकाणी हे अपार्टमेंट असून अंजली तेंडुलकरांच्या नावावर आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अनिल कपूर यांच्या लेकानं मुंबईत खरेदी केलं 5 कोटींचं आलिशान अपार्टमेंट; आतापर्यंत फक्त तीनच फिल्म्समध्ये केलंय काम

महत्त्वाच्या बातम्या

Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget