Akshay Kumar , Huma Qureshi : चित्रपटाच्या सेटवर अक्षय कुमारनं केली चोरी? हुमा कुरेशीनं सांगितला किस्सा
अक्षय कुमार आणि अभिनेत्री हुमा कुरेशीनं (Huma Qureshi) जॉली एल एल बी 2 (Jolly LLB 2) या चित्रपटामध्ये एकत्र काम केले आहे.

Akshay Kumar , Huma Qureshi : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) चित्रपटाच्या सेटवर मजा मस्ती करत असतो. त्याच्याबरोबर काम करणारे सहकलाकार नेहमी अक्षयचे मजेशिर किस्से कार्यक्रमामध्ये सांगत असतात. अक्षय कुमार आणि अभिनेत्री हुमा कुरेशीनं (Huma Qureshi) जॉली एल एल बी 2 (Jolly LLB 2) या चित्रपटामध्ये एकत्र काम केले आहे. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झालेला एक किस्सा हुमा कुरेशीनं 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) मध्ये सांगितला.
द कपिल शर्मा शोमध्ये जेव्हा कपिलनं हुमाला प्रश्न विचारला की, शूटिंग दरम्यान अक्षय काय मजा मस्ती करत होता? तर हुमानं उत्तर देत सांगितलं, 'अक्षय सेटवर खूप मजा मस्ती करतो तो चोरी देखील करतो. सेटवरील समान, फोन या गोष्टी अक्षय चोरतो. एकदा अक्षयनं माझा फोन चोरला होता. माझा फोन घेऊन त्यानं सर्व अभिनेत्यांना मेसेज केला की, माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि मी मला तुमच्यासोबत लग्न करायचंय' हा किस्सा ऐकून शोमधील प्रेक्षक हसत होते. त्यानंतर कपिल अक्षयला म्हणाला, 'तुम्ही मला का मेसेज केला नाही माझा नंबर नाहिये का तुमच्याकडे?'
View this post on Instagram
अक्षयच्या ‘बेलबॉटम’ , ‘सूर्यवंशी’ , ‘अतरंगी रे’ या चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आता लवकरच त्याचे अक्षयचे राम सेतू , पृथ्वीराज,बच्चन पांडे, रक्षाबंधन आणि मिशन सिन्ड्रेला हे आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
संबंधित इतर बातम्या
Rudra Trailer : प्रतीक्षा संपली, Ajay Devgn ची पहिली वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ट्रेलर प्रदर्शित
Aaya Ye Jhund Hai Song : 'आया ये झुंड है...'; झुंडचं धमाकेदार गाणं रिलीज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
























