Alia Bhatt : आई झाल्यानंतर आलिया भट्टचं फिटनेसवर लक्ष; जिमच्या बाहेरचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Alia Bhatt : आई झाल्यानंतर आलिया भट्ट तिच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहे. तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती जिममध्ये जाताना दिसतेय.
Alia Bhatt : बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. तिने 6 नोव्हेंबर रोजी एका छोट्या परीला जन्म दिला. आलिया भट्ट आणि रणवीर कपूर यांनी आप्या मुलीचे नाव 'राहा' असे ठेवले आहे. आई झाल्यानंतर आलियाने तिची मुलगी राहाची झलक दाखवली आहे. डिलिव्हरीनंतर आलिया आता तिच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहे.
जिमच्या बाहेर दिसली आलिया भट्ट
आलिया भट्टचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती जिमच्या बाहेर दिसत आहे. व्हिडीओमध्ये आलिया काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. तिच्या हातात एक बॅग देखील आहे. ज्यामध्ये जिमशी संबंधित वस्तू आहेत. व्हिडिओमध्ये आलिया भट्ट जिमच्या लिफ्टमधून आत जाताना दिसत आहे. फिटनेसबाबतच्या तिच्या डेडीकेशनचे तिचे चाहते कौतुक करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
आलियाचा व्हिडीओ
जिममध्ये वर्कआऊट करण्यासोबतच आलिया भट्ट योगासनेही करतेय. तिची काही फोटो समोर आली आहेत, ज्यामध्ये ती योगा सत्रानंतर तिच्या कारकडे जात आहे. डिलिव्हरीनंतर आलिया पहिल्यांदाच वर्कआऊट सेशननंतर दिसली आहे.
View this post on Instagram
आलिया भट्टचे चित्रपट
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आलिया भट्ट शेवटची 'ब्रह्मास्त्र' मध्ये दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. आता आलिया 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये ती रणवीर सिंहबरोबर दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहर करत आहे. यापूर्वी आलिया आणि रणवीरने झोया अख्तर दिग्दर्शित 'गली बॉय' या चित्रपटात एकत्र काम केले आहे. याशिवाय आलियाकडे हार्ट ऑफ स्टोन हा हॉलिवूड चित्रपट आहे, ज्यामध्ये तिच्या सहकलाकार गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
Alia Bhatt Daughter Name : नीतू आजीनं ठेवलं नातीचं नाव, आलियानं 'राहा' नावाचा अर्थही सांगितला